18 September 2019

News Flash

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

बार सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याने कारवाई

बार सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याने कारवाई

अवैधरीत्या बार सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटय़े यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बारमालकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळेच शेटय़े हे दोषी आढळले आहेत. विभागीय चौकशीत आरोप सिद्ध झाले असल्यामुळे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी सदर कारवाई केली आहे.  दरम्यान, याच प्रकरणी आणखी एका हवालदारालाही निलंबित करण्यात आले आहे.  चित्रफितीत शेटय़े हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविषयी अपशब्द वापरताना आणि आपल्या छत्रछायेखाली अवैधरीत्या बार सुरू ठेवण्यासाठी बारमालकांना संरक्षण देताना दिसत होते.  त्यानुसार, वरिष्ठांनी घटनेची सत्यता पडताळण्यासाठी शेटय़े यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.

First Published on August 19, 2019 1:37 am

Web Title: loksatta crime news mpg 94