विविध राजकीय पक्ष, त्यांचे नेते यांची ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ हे सर्वसामान्यांसाठी नेहमी कुतूहलाचे, कधी कौतुकाचे आणि प्रसंगी क्रोधाचेही कारण राहिलेले आहे. महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आगामी काळात या प्रमुख पक्षांचे येत्या दहा वर्षांतील राजकारण कसे असेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘लोकसत्ता’ची ही ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही दूर-संवादमाला. आगामी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशा सहा पक्षांचे प्रमुख नेते या उपक्रमातील वेबसंवादात आपले विचार मांडतील.

देशातील सर्वात प्रगतीशील म्हणवल्या जाणाºया महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. करोनामुळे गेली दोन वर्षे राज्याला कठोर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अन्य राज्यांची स्पर्धा असली तरी विदेशी गुंतवणुकीपासून औद्योगिक, सेवा क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, स्थावर मालमत्ता यात महाराष्ट्र  नेहमीच आघाडीवर राहिले.

raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
Raigad
रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षांत महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या मार्गाने होईल, त्या वाटचालीतील राजकीय आव्हाने, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा आढावा या नेतेमंडळींकडून घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या वर्षी झालेल्या ‘साठीचा गझल… महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याने कशी प्रगती केली याचा आढावा घेतला होता. ‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवादातून भविष्याचा वेध घेतला जाणार आहे.

सहा दिवसांत…

३१ मेपासून ५ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजता होणाºया या वेबसंवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे भूमिका मांडणार आहेत. समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने होईल.

-: वेळापत्रक :-

३१ मे: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे

१ जून: मनसेचे प्रमुख राज ठाकरे

२ जून:  वंचित बहुजन आघाडीचे  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

३ जून: काँग्रेसतर्फे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

४ जून: माजी मुख्यमंत्री, भाजपचे देवेंद्र फडणवीस

५ जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ऑनलाइन सहभागासाठी…

या दूर-संवाद मालेत सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/LS_Drushti_ani_Kon येथे नोंदणी आवश्यक.

क्यूआर कोडद्वारेही सहभागी होता येईल.

प्रायोजक

* प्रस्तुती :  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

* सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.