स्त्री म्हणजे माता, गुरू, सखी वगैरे आहेच. पण स्त्री म्हणजे त्याहूनही अधिक काही तरी आहे. स्त्री म्हणजे परिस्थितीशी झगडून, अनेक अडथळ्यांवर मात करत, कधी बुद्धिमत्तेचा, कधी गुणवत्तेचा वापर करून, तर कधी संघटन कौशल्य वापरून समाजासाठी विधायक कार्य करणारी.. विविध कार्यातून स्त्रिया कित्येक क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आदर्श निर्माण करत असतात. अशा असीम कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रिया आपल्यासाठी ‘दुर्गा’च असतात. त्यांचा गौरव करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

समाजात कर्तृत्व गाजवलेल्या अशा नऊ दुर्गाना ‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी गौरवण्यात येते. नवरात्रीचे नऊ दिवस आपण या दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’मधून दररोज प्रसिद्ध करतोच, शिवाय त्यांचा एका भरगच्च कार्यक्रमात सत्कारही करण्यात येतो. ‘बेडेकर मसाले’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान-संशोधन-शास्त्रज्ञ, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य वा अन्य कोणतेही क्षेत्र असो, तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील कोणीही अशा कर्तृत्ववान ‘दुर्गा’ची माहिती पुरस्कारासाठी पाठवू शकता. फक्त पाचशे शब्दांत आणि नोंदी स्वरूपात पाठवल्यास उत्तम. मात्र या दुर्गाचे काम विधायक, समाजावर चांगला परिणाम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रात उच्च पदाला पोहोचलेले असावे.

आपल्या आसपासच्या ‘दुर्गा’ची माहिती आम्हाला कळवा

आमचा पत्ता- लोकसत्ता नवदुर्गा, द इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड, प्लॉट नंबर ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई-४००७१०