लोकसत्ता ‘दुर्गा’ पुरस्कारांसाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

सगळ्याच क्षेत्रात आज प्रगती होत आहे, मात्र म्हणून जगण्याचा, जगवण्यासाठीचा संघर्ष संपला आहे असं अजिबात नाही. स्त्रियांना घर आणि त्याबरोबरच बाहेरच्या आघाडीवरही त्यासाठी परिस्थितीशी झगडावे लागते, कित्येक अडथळ्यांवर मात करावी लागते. मात्र कधी बुद्धिमत्तेचा, कधी गुणवत्तेचा वापर करून, तर कधी संघटन कौशल्य वापरून त्या समाजासाठी विधायक कार्य सुरू ठेवतात. हे कार्य करताना संशोधन, विज्ञान, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, संरक्षण असं कुठलंच क्षेत्र स्त्रियांना वज्र्य नाही. विविध क्षेत्रांत आपला आदर्श निर्माण करणाऱ्या असीम कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रिया आपल्यासाठी ‘दुर्गा’च असतात. त्यांचा गौरव करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

समाजात कर्तृत्व गाजवलेल्या अशा नऊ दुर्गाना ‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी गौरवण्यात येते. नवरात्रीचे नऊ दिवस आपण या दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’मधून दररोज प्रसिद्ध करतोच, शिवाय त्यांचा एका भरगच्च कार्यक्रमात सत्कारही करण्यात येतो. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘केसरी’ असून ‘बेडेकर मसाले’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, विज्ञान-संशोधन-शास्त्रज्ञ, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य वा अन्य कोणतेही क्षेत्र असो, तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील कर्तृत्ववान ‘दुर्गा’ची माहिती पुरस्कारासाठी पाठवू शकता. फक्त पाचशे शब्दांत आणि नोंदी स्वरूपात पाठवल्यास उत्तम. मात्र या दुर्गाचे काम विधायक, समाजावर चांगला परिणाम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रात उच्च पदाला पोहोचलेले असावे. शिवाय वयाची अटही नाही.

आमचा पत्ता

लोकसत्ता नवदुर्गा, द इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड, प्लॉट नंबर ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी महापे, नवी मुंबई-४००७१०. तसेच loksattanavdurga@gmail.com या ई-मेलवरही आपण आपली माहिती पाठवू शकता.