News Flash

‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’

वसुंधरेच्या संवर्धनाचा राज्यभर संकल्प

संग्रहित छायाचित्र

गणेशोत्सवात भक्तिभावाबरोबरच वसुंधरेशीही नाते जपणाऱ्यांकरिता ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या वतीने यंदाही ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि नागपूर या विभागांत घेतली जाईल.

करोनाचे सावट असल्याने अनेक गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही मूर्तीची प्रतिष्ठापना करून, साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवत असल्याने नागरिकांमध्ये पर्यावरणविषयी जागरुकताही वाढत आहे. प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणासाठी घातक वस्तूंवर बंदी असल्याने गणेशभक्तांनी सजावटीचे अनेक कल्पक मार्ग शोधले आहेत. याच कल्पकतेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिज्ञा पर्यावरण रक्षणाची!

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’तर्फे  गणेशोत्सवानिमित्ताने निसर्ग आणि वसुंधरेच्या संवर्धनासाठी संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा संकल्प म्हणजे, वर्षभरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा करू. दैनंदिन जीवनात प्लास्टिकच्या पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करू. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करून जल नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची शपथ घेऊ. विजेचा अतिरेक टाळू. घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करून ंत्याचे सेंद्रिय खत निर्माण करू. टाकाऊ वस्तूंचा कमीतकमी वापर आणि हरित जीवनशैली हीच भविष्यातील समृद्ध निसर्गाची नांदी ठरेल.

सहभागासाठी..

स्पर्धेत सहभागासाठी पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीची आणि सजावटीची वेगवेगळी पाच ते सहा छायाचित्रे  ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात १ सप्टेंबपर्यंत पाठवावीत. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि सजावट यांची तीन वेगवेगळ्या बाजूंनी काढलेली छायाचित्रे पाठवणे आवश्यक. प्रत्येक छायाचित्रासोबत  आपले नाव, पत्ता, दूरध्वनी, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि सजावटीला वापरलेल्या साहित्याची यादी पाठवावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. छायाचित्रे टपाल, कुरियर अथवा loksatta.ecoganesha@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावीत.

पारितोषिके

* नऊ हजार ९९९ रुपयाचे प्रथम पारितोषिक

* सहा हजार ६६६ रुपयांचे द्वितीय पारितोषिक

* २००१ रुपये विशेष पारितोषिक

* विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी संपर्क :

लोकसत्ता ब्रँड विभाग, ७वा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई. मो. क्र. ९७७३१५९२४.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:15 am

Web Title: loksatta eco friendly domestic ganeshotsav competition abn 97
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 १ लाख ३० हजार कर्मचारी रेल्वेच्या ई-पासपासून वंचित
2 करोना रुग्णांसाठी सहायक उपचार पद्धतींचीही गरज
3 ‘कुटुंबांसाठी आधार गट हवेत’
Just Now!
X