वृत्तपत्राच्या दैनंदिन कामकाजाबाबत सर्वसामान्य वाचकांच्या मनात नेहमीच कायम एक कुतूहल असते. वृत्तपत्राची भूमिका, त्यातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची निवड, त्या बातम्यांमागच्या बातम्या, वृत्तपत्र कार्यालयातील वातावरण अशा अनेक गोष्टींबाबत जाणून घेण्याची संधी वाचकांना चालून आली आहे. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘संपादक तुमच्या भेटीला’ हा कार्यक्रम येत्या शनिवारी, २२ नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत होत असून त्या निमित्ताने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी वाचकांना संवाद साधता येणार आहे.
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका किंवा चित्रपटातून वृत्तपत्र कार्यालय आणि वृत्तपत्राचे कामकाज याविषयी जे काही दाखविले जाते त्यापेक्षा वास्तवात खूप वेगळे असते. दररोजच्या दैनिकात इतक्या बातम्या कुठून आणि कशा येतात, वृत्तपत्रातील जाहिराती आणि बातम्या यांचे प्रमाण, वृत्तपत्राच्या संपादकाला काम करताना बाळगावी लागणारी अवधाने, राजकीय किंवा सामाजिक दबाव असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात असतात. यासाठीच ‘लोकसत्ता’चे संपादक आणि वाचक यांच्यात थेट संवाद घडवून आणणाऱ्या ‘संपादक तुमच्या भेटीला’ या आगळ्या उपक्रमाचे आयोजन ‘लोकसत्ता’ने केले आहे.  या उपक्रमाअंतर्गत शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची मुलाखत घेतील. शिवाय वाचकांनाही कुबेर यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे.
*‘संपादक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून ही नावनोंदणी दूरध्वनीद्वारेच करायची आहे.
*कार्यक्रमासाठी जागा मर्यादित असल्याने ‘प्रथम दूरध्वनी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणी करताना वाचकांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नोंदविला जाणार आहे.  
*कार्यक्रमाची नावनोंदणी रविवार १६ नोव्हेंबर आणि सोमवार १७ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत केली जाणार आहे.
*नावनोंदणीसाठी संपर्क:  योगेश मोरे : ९३२२९०६५०९ अजय चुघ : ९०२२९३११८८

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Supreme Court understanding of Ajit Pawar group regarding use of clock symbol
वृत्तपत्रात निवेदन ठसठशीत छापा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला समज
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका