News Flash

उत्साह शिगेला!

‘लोकांकिके’विषयी असलेल्या उत्साहामुळे त्यांनी या कसरतीचे आव्हान अगदी सहजपणे स्वीकारलेले दिसून आले.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई अंतिम फेरीसाठी कसून सराव

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागातील प्राथमिक फेरीत निवडून आलेल्या सहा एकांकिकांना आता अंतिम फेरीचे वेध लागले आहेत. ‘पंच लाइन’ नीट घ्या, चपळपणे वेळेत सेट लावा, दोन भागांच्या मधल्या वेळेत शक्य तितक्या लवकर पुढच्या भागाची तयारी करा, अशा सूचनांचा भडिमार एकीकडून दिग्दर्शकांकडून होत असताना अभिनय करणारे कलाकारही आपल्या संवादफेकीत सुधारणा करताना दिसत आहेत. बहुतेक महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असल्याने अभ्यासासोबतच तालमींसाठी वेळ काढण्याची तारेवरची कसरत करताना मुलांची दमछाक होत आहे. परंतु ‘लोकांकिके’विषयी असलेल्या उत्साहामुळे त्यांनी या कसरतीचे आव्हान अगदी सहजपणे स्वीकारलेले दिसून आले.

विभागीय अंतिम फेरी रविवार, ११ डिसेंबर

  • वेळ- सकाळी ९.४५ वा.
  • कुठे- स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 2:37 am

Web Title: loksatta ekankika mumbai
Next Stories
1 ‘हॅलो. हॅलो. माइक चेक, चेक’
2 कचरा वाहून नेण्यात ९०० कोटी रुपयांचा घोटाळा
3 चर्चगेटहून मध्य रेल्वेसाठी लोकल अशक्य
Just Now!
X