दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. पर्यावरण दिनानिमित्त जगभर नवनवीन उपक्रम राबविले जातात. परंतु, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक दिवसाच्या कार्यक्रमाची नव्हे, तर सातत्यपूर्ण आणि कायम उपाययोजनांची आवश्यकता आहे.

‘लोकसत्ता’च्या वाचकांनी पाठवलेल्या घरातील बागेच्या फोटोंची गॅलरी 

गेल्या काही वर्षांत पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होत असून, अनेकजण आपापल्या पातळीवर काहीतरी करत आहे, हे विशेष. आयुष्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि ते वाढवावे असं म्हणतात. पण आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी घराच्या अंगणात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर संपूर्ण बागच फुलवलेली आहे. त्यामुळे पर्यावरण दिनाचे खरे सेलिब्रिटी ही मंडळी आहेत. म्हणूनच ‘लोकसत्ता’ तुम्हाला ही विशेष संधी देत आहे. तुमच्या या झाडांचे किंवा बागेचे जास्तीतजास्त दोन फोटो आम्हाला loksatta.express@gmail.com वर पाठवा. सोबत तुमचे नाव आणि तुम्ही कुठे राहता, हे नमूद करायला विसरू नका. शिवाय तुम्ही तुमच्या बागेमध्ये काही विशेष प्रयोग केले असतील तर तेही आम्हाला थोडक्यात (५० शब्दांत) कळवा. आम्ही ते सर्व फोटो ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर आणि फेसबुक, टि्वटर, गुगल प्लस या सोशल मीडिया पेजवर शेअर करू. तर मग वाट कसली पाहताय, उचला कॅमेरा आणि लागा कामाला…