‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१८’ला सुरुवात; ५१,००१ रुपयांचे भव्य पारितोषिक; प्रवेशिका उद्यापासून उपलब्ध

प्रतिनिधी, मुंबई

what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Liquor Licenses pune
पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा

गणरायाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज होऊ लागली आहे. गणेश कार्यशाळांमध्ये आकारास आलेल्या गणेशमूर्तीवरून कुंचल्यांचे अखेरचे हात फिरविले जात आहेत. मंडपांमध्ये सजावटीने वेग घेतला आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवात कसलीच कमतरता राहू नये यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते झटत आहेत. या धामधुमीमध्ये ‘मुंबईचा राजा’चा मान मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा-२०१८’च्या आयोजनाची घोषणा करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठय़ा दणक्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ५१,००१ रुपयांचे भव्य पारितोषिक मिळवून देणाऱ्या या स्पर्धेच्या प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यंदा ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा-२०१८’चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सवरेत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा सन्मान आणि ५१,००१ रुपयांचा भव्य पुरस्कार देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे सहप्रायोजक रिजन्सी ग्रुप, पॉवर्ड बाय व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, मिलसेंड्स आणि बी. जी. चितळे आणि बँकिंग पार्टनर अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहेत.

पारितोषिकासाठी मंडळाची निवड करताना सवरेत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, उत्कृष्ट मूर्ती, आरास, कला दिग्दर्शन, देखाव्याची कल्पना याबरोबरच जागतिक, राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवरील जनजागृती, पारंपरिकता, उच्च कला अभिरुची, पर्यावरण, मंडळाने वर्षभरात केलेले उपक्रम, सामाजिक काम, गणेशमूर्ती देखावा, विषयांची निवड, देखाव्यातील व्यक्तिरेखांच्या उंचीचे मोजमाप, चलचित्रांच्या हालचाली, प्रकाशयोजना, सजावटीचा विषय, मंडळाकडून ठेवली जाणारी स्वच्छता कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिक्षेपकाचा आवाज याचाही विचार करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना एकूण २६ पारितोषिके आणि ४४ सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. पर्यावरणस्नेही सजावटीसाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक विभागासाठी १५,००१ रुपयांचे विशेष पारितोषिकही देण्यात येणार असून सवरेत्कृष्ट मूर्तिकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखक या विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे वैयक्तिक २,५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानचिन्ह असे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या प्रवेशिका ८ व ९ सप्टेंबर रोजी उपलब्ध करण्यात येणार असून १० व ११ सप्टेंबर रोजी त्या भरून सादर करायच्या आहेत. या स्पर्धेत कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई (शहर) या विभागांतील मंडळे सहभागी होऊ शकतील.

प्रवेशिका मिळण्याचे आणि सादर करण्याचे ठिकाण

(वेळ – स. १०.३० ते सायं. ५.३०. प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध)

* मुंबई : लोकसत्ता, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – २१. संपर्क – धर्मेश म्हसकर – ९७७३१५४९२४

* ठाणे (पश्चिम) : लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे

संपर्क – मिलिंद दाभोळकर – ९१६७२२१२४६

* डोंबिवली (पूर्व) : सप्तशर्ती ज्वेलर्स – मंदार न्यूज पेपर्स एजन्सी, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता, डोंबिवली

संपर्क – रोहित पानसरे ९८९२६५१३२२,

महेश ठोके ९८३३६१०३७५

* नवी मुंबई : अनंत वाकचौरे ९३२२९०६५०६