News Flash

समृद्ध मराठी काव्यविश्वाचा फेरफटका…

‘गाथा महाराष्ट्राची’ उपक्रमाचा समारोप आज अरुणा ढेरे यांच्या व्याख्यानाने

शाळेत जायला लागल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्यात कवितेचाही प्रवेश होतो. अनेक जण काव्याच्या या तरल प्रदेशात हरखून जातात, काही जण कवीही होतात. कवितेच्या प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला मराठी कवितेच्या समृद्ध परंपरेचा धांडोळा घ्यावा, असे वाटतेच. त्यासाठी आज, दि. १४ मे रोजी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन केले असून त्याचा समारोप डॉ. ढेरे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘मराठी कवितेची परंपरा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असून ते सायंकाळी सहा वाजता झूमद्वारे ऐकता येणार आहे.

माधव ज्यूलिअन, सुरेश भट, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, बा. सी. मर्ढेकर, ग्रेस, पु. शि. रेगे अशी कितीतरी नावे जरी आठवली, तरी साहित्य समृद्धीची अपूर्वाई जाणवू लागते. या परंपरेतील महत्त्वाचे टप्पे समजावून घेत, मराठी कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करण्याची ही संधी खास ‘लोकसत्ता’ वाचकांसाठी मिळणार आहे.

सहभागासाठी क्यूआर कोडही स्कॅन करता येईल.

http://tiny.cc/LS_Maharashtra_Gaatha येथे नोंदणी आवश्यक.

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह

बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग सर्व्हिसेस, पुणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 1:49 pm

Web Title: loksatta gatha maharashtra dr aruna dhere abn 97
Next Stories
1 शिवसेनेनं पार्टी फंडातून लशी विकत घेतल्या का?; वांद्रेतील लसीकरण केंद्रावरून काँग्रेस आमदाराचा सवाल
2 मुंबईत पेट्रोल दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे दर
3 गृहनिर्माण संस्थांतील लसीकरण बारगळणार
Just Now!
X