‘लोकसत्ता दृष्टिकोन’तर्फे वाचकांना अभूतपूर्व संधी ल्ल गुगल हँगआऊटद्वारे संवाद
राज्यातीलच नाही, तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण करून त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘लोकसत्ता’ सातत्याने करत आले आहे. मात्र वाचकांशी असलेला हा ऋणानुबंध अधिक दृढ व्हावा, यासाठी आता ‘लोकसत्ता ऑनलाइन’ एक अभूतपूर्व उपक्रम राबवत आहे. यात सहभागासाठी आज, बुधवारी अखेरची संधी आहे.
‘लोकसत्ता दृष्टिकोन’ या उपक्रमाच्या माध्यमातून काही निवडक वाचकांना थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी ‘व्हच्र्युअल संवाद’ साधण्याची संधी मिळणार आहे. यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या प्रश्नोत्तरांच्या स्पर्धेतील तीन प्रश्नांची अचूक उत्तरे वाचकांना द्यायची आहेत. त्यातील निवडक वाचकांना ‘गुगल हँगआऊट’च्या माध्यमातून ही संधी प्राप्त होणार आहे. ‘लोकसत्ता’चे वाचक सुजाण, सजग आणि संवेदनशील आहेत, याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. ‘लोकसत्ता’च्या वाचकांना पडणारे प्रश्न, विविध विषयांबाबतची त्यांची मते ‘वाचकांच्या पत्रां’च्या माध्यमातून प्रसिद्ध होत असतात. मात्र या प्रश्नांना अधिकारी व्यक्तींकडून उत्तरे मिळावीत, ही वाचकांची अपेक्षा अगदी स्वाभाविक आहे. याचसाठी मुख्यमंत्री आणि वृत्तपत्राचे संपादक यांच्याशी संवाद साधण्याचा योग वाचकांसाठी मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात पहिल्यांदाच येणार आहे.

’ या संधीचा लाभ घेण्यासाठी https://loksatta.com/drushtikon/या संकेतस्थळाला भेट देऊन वाचकांना तीन सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
’ वाचकांना २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
’ अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांची निवड या उपक्रमासाठी केली जाणार आहे.
’‘ लोकसत्ता ऑनलाइन’तर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘लोकसत्ता दृष्टिकोन’ या विशेष उपक्रमाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘ लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर वाचकांशी ‘गुगल हँगआऊट’द्वारे संवाद साधतील.