News Flash

रंजक वेब-कृती-संवाद : चला मुलांनो, तयारीला लागा..

चार दिवस चालणाऱ्या या वेब-कृती-संवादात चित्र आणि ओरिगामी या कलांमधली गंमत मुलांना समजेल.

मुंबई : करोनाच्या साथीमुळे मुलांसमोर आहे, बराच रिकामा वेळ. तर पालकांसमोर आहे, मुलांचा अक्षय्य प्रश्न- ‘आता मी काय करू?’ याच प्रश्नाचे माहितीपूर्ण तरीही मनोरंजक उत्तर शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘मधली सुट्टी’ हा अभिनव उपक्रम आयोजित के ला आहे.

चार दिवस चालणाऱ्या या वेब-कृती-संवादात चित्र आणि ओरिगामी या कलांमधली गंमत मुलांना समजेल. ओरिगामीतील नमुन्यांची गंमत समजून घेताना मात्र हाताशी स्केचपेन, घोटीव कागद किं वा जुन्या वह्य़ांचे कोरे कागद घेऊन बसायला हवे.

आकाशात दिसणाऱ्या ग्रह-ताऱ्यांच्या विश्वात नेमक्या काय घडामोडी चाललेल्या असतात तेही समजून घेता येईल, निळ्या आकाशापलीकडे दडलेल्या या अफाट विश्वातील अवाक् करणारी निरनिराळी गुपिते जाणून घेता येतील.

करोनाकाळात समाजातील तारांकित व्यक्तींशी ऑनलाइन गप्पा रंगवण्यापासून ते महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राची विविधांगी ओळख करून देणाऱ्या ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेपर्यंत वैचारिक, सांस्कृतिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन ‘लोकसत्ता’ने केले. बालगोपाळांसाठी हा पहिलाच उपक्रम आहे.

मुलांची ‘मधली सुट्टी’ सार्थ करायची तर त्यात पालकांचाही सहभाग तितकाच मोलाचा आहे. त्यामुळे मुलांना गमतीजमतीतून गोष्टी उलगडून सांगत असताना पालकांशीही संवाद साधण्याची जबाबदारी या उपक्रमातून पार पाडली जाईल. मुले आणि पालकांच्या सक्रिय, सर्जनशील सहभागातून या लांबलेल्या सुट्टीत ज्ञानवर्धक, मनोरंजक आणि कलात्मक गोष्टी शिकण्या-शिकवण्याचा प्रयोग या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

अद्भुत आणि गमतीदार..

१९ मे रोजी ग्रहताऱ्यांच्या विश्वाची सफर मुंबईतील नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे घडवतील. २० मे रोजी ओरिगामीतील सहज-सोप्या कृती श्रीराम पत्की दाखवून देतील. २१ मे रोजी रंग-रेषा आणि आकृत्यांशी मैत्री कशी करावी याविषयी नीलेश जाधव चिमुकल्यांचा चित्रकलेचा तास घेतील, तर २२ मे रोजी ‘करोनाकाळातील पालकत्व’ यावर बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर मोलाचे मार्गदर्शन  करतील.

या उपक्रमाचे सहप्रायोजक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, मर्यादित आहेत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/LS_Madhali_Sutti  येथे नोंदणी आवश्यक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 3:02 am

Web Title: loksatta launched an innovative initiative madhli sutti for children zws 70
Next Stories
1 मुलाखतीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचा पहिला अध्यक्ष
2 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्षकांचे मूल्यमापन
3 वर्गीकरण करून रुग्णांवर उपचार करा!
Just Now!
X