News Flash

औरंगाबादची ‘भक्षक’ ठरली यंदाची लोकांकिका!

नगरच्या 'ड्रायव्हर' आणि मुंबईच्या'एक्स-प्रीमेंट' या एकांकिकांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान मिळवला

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते 'भक्षक'ला 'लोकांकिके'चा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अत्यंत उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत औरंगाबादच्या ‘भक्षक’ या एकांकिकेने बाजी मारली. शहरीकरणासाठी होणारी जंगलाची कत्तल आणि त्यामुळे वन्यजीवांवर होणारे परिणाम असा संघर्ष दाखविणाऱ्या या एकांकिकेने प्रभावी सादरीकरणासह विजेतेपदावरही मोहोर उमटवली. नगरच्या ‘ड्रायव्हर’ आणि मुंबईच्या’एक्स-प्रीमेंट’ या एकांकिकांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान मिळवला. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते ‘भक्षक’ला ‘लोकांकिके’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी महेश एलकुंचवार यांनी नव्या दमाच्या रंगकर्मींशी मनमोकळा संवाद साधला. लेखन, संगीत आणि सादरीकरण हे नाटकातील महत्त्वपूर्ण घटक कसे असावेत, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून आनंद इंगळे, परेश मोकाशी, राजन भिसे, प्रतिक्षा लोणकर आणि अभिराम भडकमकर यांनी काम पाहिले.
मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात रंगलेल्या महाअंतिम फेरीत राज्यभरातील आठ केंद्रांतून निवडण्यात आलेल्या आठ महाविद्यालयांच्या एकांकिका सादर करण्यात आल्या. यामध्ये मुंबईची ‘एक्स्प्रिमेंट’, ठाण्याची ‘मित्तर’, नाशिकची ‘व्हॉट्स अॅप’, पुण्याची ‘जार ऑफ एल्पिस’, औरंगाबादची ‘भक्षक’, नगरची ‘ड्रायव्हर’, रत्नागिरीची ‘भोग’ की नागपूरची ‘विश्वनटी’ या आठ दर्जेदार एकांकिकांचा समावेश होता. या स्पर्धेत राज्यभरातील १३३ महाविद्यालयांनी भाग घेतला होता.

सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – भक्षक, मराठवाडा विद्यापीठ नृत्यविभाग
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय)- ड्रायव्हर, पेमराज सारडा महाविद्यालय,नगर
सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय)- एक्स-प्रीमेंट, म.ल.डहाणूकर महाविद्यालय

सर्वोत्कृष्ट लेखक ( व्हॉटस अॅप) – अदील नूर शेख, के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (भक्षक) – रावबा गजमल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
सर्वोत्कृष्ट अभिनय ( भक्षक)- ‘बिबट्या’- रावबा गजमल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ड्रायव्हर)- ‘रमा’- गौरी मार्डीकर, पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट अभिनय (जार ऑफ एल्पिस)- ‘अभिनेत्री’- श्रुती अत्रे- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (ड्रायव्हर) – आश्लेषा कुलकर्णी, पेमराज सारडा महाविद्यालय, नगर
सर्वोत्कृष्ट संगीत (भक्षक)- भरत जाधव आणि अनिल बर्डे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नृत्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना ( विश्वनटी) – वैदही चवरे- डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालय, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 10:00 pm

Web Title: loksatta lokankika 2015 final results announced
Next Stories
1 विक्रोळीत घरात सिलेंडर स्फोट; ६ जण जखमी
2 राज्यात दुष्काळ जाहीर
3 नवी मुंबईतील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी धोरण
Just Now!
X