दहावी-बारावीनंतरच्या करिअर वाटा

आजच्या तरुणाईकडे करिअरचे अनेक पर्याय आहेत. पदविका, पदवी, पदव्युत्तर अशा अनेक टप्प्यांवरच्या उच्चशिक्षणासाठी जगभरातील संस्थांची द्वारे खुली आहेत. परंतु या माहितीच्या महापुरातून नेमका करिअर मार्ग धुंडाळण्यासाठी गरज असते ती निरनिराळ्या क्षेत्रातील प्रत्यक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची, करिअर समुपदेशनाची. त्याचसाठी ‘लोकसत्ता’तर्फे मार्ग यशाचा ही करिअर कार्यशाळा घेतली जाते.

येत्या ५ आणि ६ जूनला ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स प्रस्तुत लोकसत्ता मार्ग यशाचा सहप्रायोजक विद्यालंकार क्लासेस’ ही करिअर कार्यशाळा होत आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ तर आपल्या क्षेत्रांविषयी बोलण्यास येतीलच शिवाय करिअर समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञही विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास उपस्थित राहणार आहेत.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी ‘करिअर निवडीतील ताण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तर वैद्यकीय क्षेत्रातील करिअरविषयी डॉ. सागर मुंदडा आणि डॉ. अमोल अन्नदाते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

विधी शिक्षणाविषयी प्रा. नारायण राजाध्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. वेबविश्वातील करिअरविषयी बोलतील, ‘भारतीय डिजिटल पार्टी’ अर्थात ‘भाडिपा’चे सारंग साठय़े आणि समाजमाध्यमांवर विशेष काम करणारी तरुण मराठी ब्लॉगर प्रिया अडिवरेकर. तसेच संवाद-पटकथा लेखन या विषयावर संवाद साधतील, सचिन दरेकर. टीव्ही पत्रकारितेच्या ग्लॅमरमागची मेहनत उलगडून सांगतील एबीपी माझाच्या पत्रकार ज्ञानदा कदम. याचसोबत करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

या सर्व तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. सोबतच आपल्या मनातील प्रश्न आणि शंकांचे समाधानही या तज्ज्ञांशी थेट संवाद साधून करता येईल.

हे लक्षात ठेवा..

  • या कार्यशाळेसाठी प्रत्येकी ५० रु. शुल्क भरून नोंदणी करावी लागेल.
  • खालील ठिकाणी स. १०.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात प्रवेशिका मिळू शकतील.
  • जिन्स जंक्शन, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
  • टिपटॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड चेक नाक्याजवळ, ठाणे
  • लोकसत्ता कार्यालय, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेवर, नवजीवन रक्तपेढीच्या शेजारी, नौपाडा, ठाणे (प.)
  • त्याचबरोबर पुढील लिंकवरूनही विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतात. http://tiny.cc/margyashacha2019thane

प्रायोजक

या कार्यशाळेचे ‘टायटल स्पॉन्सर’ ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ हे असून सहप्रायोजक ‘विद्यालंकार क्लासेस’ आहेत. एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन ओव्हरसीज, सासमिरा, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, युक्ती हे ‘पॉवर्डबाय पार्टनर’ असून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिंग पार्टनर आहे.