News Flash

‘मग, बारावीनंतर कुठं जाणार?’

विद्यार्थी जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी - ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’

विद्यार्थी जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी – ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’

विद्यार्थी आणि त्यांचे पालक.. या दोघांच्याही आयुष्यातला हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्याच्या एका उत्तरावर मुलांचे भावी आयुष्य अवलंबून असते.

करिअरचे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत. काही नेहमीचे यशस्वी, काही वेगळे नवे. पण ते निवडायचे कसे? आपल्या मुलांसाठी ती निवड योग्य ठरू शकेल काय? त्या मार्गात पुढे खाचखळगे तर नाहीत ना? आणखी पाच-सहा वर्षांनंतर त्या करिअरला भवितव्य असेल का? विविध प्रश्न, विविध शंका. त्यांची उत्तरे आधीच तज्ज्ञांकडून जाणून घेणे महत्त्वाचे.

त्यासाठीच आहे – ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही  करिअर कार्यशाळा. येत्या २४-२५ मे रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे ही कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे टायटल पार्टनर आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स असून, असोसिएट पार्टनर – विद्यालंकार क्लासेस, झील अकादमी आणि संदीप युनिव्हर्सिटी, पॉवर्ड बाय पार्टनर – एडय़ुरशिया (ओव्हरसीज अ‍ॅडमिशन्स फॉर मेडिकल, इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड एमबीए), गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, के ११ अ‍ॅकॅडमी ऑफ फिटनेस सायन्स, कैझेन मल्टीमीडिया, संकल्प मेश्रामज द आर्ट ऑफ सिनेमा कोर्सेस, उत्क्रांती राइज अ‍ॅण्ड राइज, युक्ती इंजिनीअरिंग, मेडिकल अ‍ॅण्ड फाऊंडेशन हे आहेत.

करिअरची गुरुकिल्ली..

  • ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये.. करिअरचा ताण कमी करण्यासाठीच्या टिप्स देतील, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, तर करिअर समुपदेशक विवेक वेलणकर सांगतील, करिअरची निवड कशी कराल?
  • वैद्यकीय क्षेत्रातल्या अनुभवांविषयी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते; तर इंजिनीअरिंग क्षेत्रातील करिअर संधींविषयी बोलतील, या क्षेत्रातील ३० वर्षांहून जास्त अनुभव असणारे आणि त्यावर पीएचडी मिळवलेले डॉ. जयंत पानसे.
  • यूपीएससी आणि एमपीएससीच्या यशाचा कानमंत्र देतील, त्यातील यशस्वी विद्यार्थी. एमपीएससी उत्तीर्ण आणि सध्या नाशिक जिल्हा परिषदेचे प्रोबेशनरी डेप्युटी सीईओ असणारे, अनिल नागणे आणि यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय संचार लेखा वित्त सेवेत काम करणारे, मंदार देशपांडे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
  • करिअरच्या वेगळ्या वाटा या चर्चासत्रात बोलतील, शेफ देवव्रत जातेगावकर, चित्रकार, समीक्षक महेंद्र दामले आणि लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अभिराम भडकमकर.

 

प्रवेशिका : खालील ठिकाणी स. १० ते सायं. ६ पर्यंत उपलब्ध

  • रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, मुंबई
  • लोकसत्ता कार्यालय, सातवा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई
  • विद्यालंकार हाऊस, प्लॉट क्रमांक ५६, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर (पूर्व) झील अकादमी (अंधेरी), तळ मजला, उत्कर्ष बिल्डिंग, बाटा शॉपजवळ, अंधेरी पश्चिम स्थानकासमोर, संपर्क : ८६५२७७९५९७.
  • झील अकादमी (गोरेगाव), क-१०१, सुमित समर्थ आर्केड, आरे रोडसमोर, जैन मंदिर, गोरेगाव (प.), संपर्क : ८६५२७७८५५३.

कार्यक्रमाची प्रवेशिका या संकेतस्थळावरही उपलब्ध https://www.townscript.com/e/loksatta-marga-yashacha-mumbai-234014

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 1:32 am

Web Title: loksatta marg yashacha 25
Next Stories
1 कर्नाटकातील भाजपच्या पराभवामुळे शिवसेना खूश
2 विधान परिषद निवडणुकीत आकडय़ांच्या खेळात शिवसेनेची कसोटी
3 सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव
Just Now!
X