दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा; समुपदेशक व तज्ज्ञांकडून दोन दिवस मार्गदर्शन
मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी दहावी-बारावीनंतरच्या शिक्षणासाठी वेगळ्या वाटा उघडय़ा करून दिल्यानंतर आता ठाणे आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी २५ आणि २६ मे (बुधवार व गुरुवार) रोजी ‘मार्ग यशाचा’ हा कार्यक्रम ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा कार्यक्रम ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटक म्हणून पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे उपस्थित असतील.
या दिवशी ‘लोकसत्ता’मधील ‘मनमोराचा पिसारा’ या सदराद्वारे घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. राजेंद्र बर्वे हे मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि ललित कला या क्षेत्रांतील करिअरच्या वाटा दाखवण्यासाठी दोन्ही दिवस अनुक्रमे दीपाली दिवेकर, चंद्रकांत मुंडे आणि जयवंत कुलकर्णी हे वक्ते हजर असतील, तर विज्ञान शाखेतील नवनवीन करिअरच्या संधींबाबत माहिती देण्यासाठी बुधवार, २५ मे रोजी श्रीकांत शिनगारे आणि गुरुवार, २६ मे रोजी विवेक वेलणकर उपस्थित असतील.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी साहित्यिक आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी हे उद्घाटक असतील, तर या दिवशी हरीश शेट्टी हे मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक विद्यार्थ्यांची मदत करतील.

प्रवेशिका येथे मिळतील..
अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीने प्रेझेंट केलेल्या व विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय युक्ती तसेच पॉवर्ड बाय गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन, अरेना अ‍ॅनिमेशन, एन. ए. एम. एस. शिपिंग मॅनेजमेंट प्रा. लि., पारुल युनिव्हर्सिटी, गणपत युनिव्हर्सिटी, रोबोमेट आणि सास्मिरा आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे ‘नॉलेज पार्टनर’ ‘आयटीएम’ हे आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका टिपटॉप प्लाझा, लोकसत्ता ठाणे कार्यालय आणि http://www.bookmyshow.com या संकेतस्थळावर ५० रुपयांच्या नाममात्र शुल्कात उपलब्ध असतील.