20 September 2020

News Flash

वाशीमध्ये लोकसत्ता ‘मार्ग यशाचा’ !

उत्तम करिअर करू पाहणाऱ्या महामुंबईतील विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’

समुपदेशक व तज्ज्ञांकडून ३ व ४ जूनला मार्गदर्शन
उत्तम करिअर करू पाहणाऱ्या महामुंबईतील विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे व मुंबईतील यशानंतर हा कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात येत्या ३ व ४ जूनला होणार आहे. या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचसोबत पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबतही माहिती दिली जाईल. या ‘नीट’ परिक्षेत नेमके काय दडले आहे याबाबत एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करतील.
वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावी लागणार ही आता काळ्या दगडावरची रेघ झाली आहे. त्या ‘नीट’ सामायिक परीक्षेच्या इत्यंभूत माहितीसह ताणमुक्त व्यक्तिमत्व विकासापासून ते विविध क्षेत्रातील करिअरच्या संधींपर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठीचा ‘यशाचा मार्ग’ ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसमोर खुला होणार आहे.
वाशीत शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात सलग दोन दिवस तज्ज्ञांकडून करिअरविषयक नवनव्या संधींविषयी माहिती करून देण्यात येणार आहे. ‘विष्णुदास भावे’ नाटय़गृहात रंगणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर, कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे करणार आहेत. या दोन दिवसीय कार्यक्रमांच्या दोन्ही सत्रांत सिक्रेट ऑफ ‘नीट’ या सध्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

विषय आणि वक्ते
* कला क्षेत्रातील वळणवाटा – दिपाली दिवेकर, करिअर समुपदेश, आयव्हीजीएस
* वाणिज्यमधील करिअर व्यवहार – अमीर अन्सारी, करिअर समुपदेशक
* ललित कलांतील ‘संधी’राग’ – जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
* विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’ – विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण
‘अ‍ॅमिटी युनिव्‍‌र्हसिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला पॉवर्डबाय म्हणून ‘आयईईआयटी डिझाइन स्टुडिओ’, ‘दिलकॅप महाविद्यालय’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आहेत. या कार्यक्रमाला नवी मुंबई पालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका रविवार, २९ मेपासून विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी आणि विद्यालंकार क्लासेस, शिव पार्वती शॉपिंग कॉम्पलेक्स, नेरूळ रेल्वे स्थानकासमोर, सेक्टर २१, नेरूळ (पू.) येथे मिळतील. त्या http://in.bookmyshow.com/mumbai या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ६७४४०३४७ किंवा ६७४४०३६९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 2:08 am

Web Title: loksatta marg yashacha in washim
Next Stories
1 चिदम्बरम यांना राज्यसभेची उमेदवारी
2 राहुल यांच्यावर तोफ डागूनही सोनियांमुळे संधी
3 जल्लोषावर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत द्यावी!
Just Now!
X