डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन; समुपदेशक व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

विद्यार्थ्यांची करिअर निवडीची वाट सुकर करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ठाणे व मुंबईतील यशानंतर शुक्रवारपासून नवी मुंबईत आयोजिलेल्या ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे उद् घाटन प्रसिद्ध मानोसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात शुक्रवार-शनिवारी ही कार्यशाळा होणार आहे. दुसऱ्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन होईल. या शिवाय दोन्ही दिवशी समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचसोबत कार्यक्रमात पुढील वर्षी वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबतही माहिती दिली जाईल. ‘नीट’ची तयारी कशी करायची याबाबत एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे   विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करतील. सलग दोन दिवस तज्ज्ञांकडून करिअरविषयक नवनव्या संधींविषयी माहिती करून देण्यात येणार आहे.  दोन्ही दिवसाचे विषय आणि वक्ते सारखेच असणार आहेत.

प्रायोजक

‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला पॉवर्डबाय म्हणून ‘आयईईआयटी डिझाइन स्टुडिओ’, ‘दिलकॅप महाविद्यालय’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आहेत. याचबरोबर या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

विषय आणि वक्ते

  • कला क्षेत्रातील वळणवाटा – दिपाली दिवेकर, करिअर समुपदेश, आयव्हीजीएस
  • वाणिज्यमधील करिअर व्यवहार – अमिर अन्सारी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
  • ललित कलांतील ‘संधी’राग – जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
  • विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’ – विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक

प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण

  • विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी
  • विद्यालंकार क्लासेस, शिव पार्वती शॉपिंग कॉम्पलेक्स, सेक्टर २१, नेरूळ (पू.)
  • विद्यालंकार, ५४ महावीर सेंटर, गोल्डन पंजाब हॉटेलच्या वर, तिसरा मजला, सेक्टर १७, वाशी

(या तीन ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध होतील)

 http://in.bookmyshow.com/mumbai या संकेतस्थळावर प्रवेशिका उपलब्ध आहे.

संपर्क- ६७४४०३४७ किंवा ६७४४०३६९