News Flash

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

बहुतेकदा या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यात अडचण येते.

ठाण्यात १९ आणि २० नोव्हेंबरला ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’

दहावी व बारावीनंतर करिअरचा नेमका कोणता पर्याय निवडायचा या गोंधळाने विद्यार्थ्यांना हमखास पछाडलेले असते. या गोंधळातून बाहेर पडून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण व करिअरचा योग्य मार्ग निवडता यावा यासाठी ‘विद्यालंकार’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा १९ व २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दहावीनंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला यापैकी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा किंवा आई-बाबा सांगतात म्हणून अभियांत्रिकीच्या पदविकेला प्रवेश घ्यायचा की मित्र-मैत्रिणींसोबत वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जवळ आला की पडण्यास सुरुवात होते. पुढे अकरावीला प्रवेश घेतल्यानंतरही ही परिस्थिती तशीच राहते, कारण पुढे बारावीनंतर काय करायचे, या नव्या प्रश्नाने पिच्छा पुरविलेला असतो.

बहुतेकदा या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यात अडचण येते. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मनातील हा गोंधळ दूर करण्यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचा त्यांना निश्चितच उपयोग होईल. तसेच कार्यशाळेत विविध विषयांवर विद्यार्थ्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन मिळणार असून ज्यायोगे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीचा मार्ग मिळू शकेल.

१९ व २० नोव्हेंबर असे शनिवार व रविवार या कार्यशाळेचा लाभ ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांना मिळणार आहे. दोन्ही दिवस या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० दरम्यान टिपटॉप प्लाझा, एल.बी.एस. रस्ता, ठाणे (प.) येथे ही कार्यशाळा पार पडेल. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही ‘विद्यालंकार’ प्रस्तुत कार्यशाळा असून ‘एलिफ ओव्हरसीज’, ‘सक्सेस फोरम’, ‘रोबोमेट प्लस’, ‘कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट’, ‘आयटीएम’, ‘विद्यासागर क्लासेस’ आदी कार्यशाळेचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत. दहावी-बारावीनंतरच्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांची आणि करिअर निवडीच्या तंत्रांची सविस्तर ओळख या कार्यशाळेतील परिसंवादातून करून देण्यात येईल.

  • कधी – १९ व २० नोव्हेंबर
  • कुठे – टिपटॉप प्लाझा, एल.बी.एस. रस्ता, ठाणे (प.)
  • केव्हा – सकाळी ९.३० ते दुपारी ४.३०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:43 am

Web Title: loksatta marg yashacha programe in thane
Next Stories
1 ‘कोल्ड प्ले’च्या सवलतींविरोधात मुख्य न्यायमूर्तीकडे तक्रार
2 लोकसत्ता वृत्तवेध : एकमेका साह्य करू..!
3 स्वागत दिवाळी अंकांचे
Just Now!
X