05 April 2020

News Flash

खरेदीवर बक्षिसे जिंकण्यासाठी शेवटचे दोन दिवस

महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला ‘केसरी टूर्स’कडून सहलीचे पॅकेज हे पारितोषिक दिले जाणार आहे.

 

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ची उद्या सांगता

मुंबई : नेहमीच्या खरेदीबरोबरच बक्षिसाचा दुहेरी आनंद मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’चे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. यात बृहन्मुंबई परिसरातील अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या दुकानांनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या ग्राहकांना आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी मिळते. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री अलका कुबल, अर्चना निपाणकर, क्रांती रेडकर, ऋग्वेदी प्रधान आदी कलाकारही सहभागी झाले होते.

महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला ‘केसरी टूर्स’कडून सहलीचे पॅकेज हे पारितोषिक दिले जाणार आहे. ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’ प्रस्तुत आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ आहेत. या महोत्सवासाठी ‘वाकडकर ज्वेलर्स’, ‘सी. ए. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘एम. व्ही. पेंडुरकर’, ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. ‘स्वरा पैठणी’, ‘शिंदे शूज’ आणि ‘असमेरा फॅशन’ गिफ्ट पार्टनर, तर ‘साने केअर’ हार्ट केअर पार्टनर आहेत. ‘एम. के. घारे ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसुळूणकर ज्वेलर्स’ आणि ‘पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स अ‍ॅण्ड सन्स’ हे गोल्ड पार्टनर आहेत. तसेच ‘एस. ए. इनामदार’, ‘पांडुरंग हरी वैद्य’ आणि ‘व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स’ हे पावर्ड बाय पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल?

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयकासोबत एक कूपन दुकानदार देतील. तसेच दागिन्यांच्या ३ हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर एक कूपन दिले जाईल. कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल व त्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध केली जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 12:15 am

Web Title: loksatta mumbai shopping festival last two days to win prizes akp 94
Next Stories
1 पूलबंदीमुळे वाहनांची रखडपट्टी
2 विस्मृतीत जाणाऱ्या ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालना’ला उजाळा
3 वांद्रे किल्ला सुशोभीकरण प्रस्ताव रोखला
Just Now!
X