12 November 2019

News Flash

नऊ दुर्गाचा उद्या सन्मान

मीरां बोरवणकर यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’

(संग्रहित छायाचित्र)

बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि संघटनकौशल्याने सामाजिक, विधायक कार्य करणाऱ्या नऊ दुर्गाचा सन्मान सोहळा मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या उपक्रमात यंदा मीरां चड्ढा बोरवणकर यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे.

वंचित मुलांसाठी ‘ज्ञानदेवी’ ही संस्था चालवून हजारो मुलांसाठी आधारवड बनलेल्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, मेळघाट येथे राहून आदिवासींच्या डोळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉ. कविता सातव, विविध सामाजिक संस्थांना दानशूर लोकांपर्यंत पोहोचवून कोटय़वधी रुपयांचे दान मिळवून देणाऱ्या वीणा गोखले, वाळूमाफियांना रोखणाऱ्या तडफदार तहसीलदार शिल्पा ठोकडे, लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना मानसिक वेदनेतून बाहेर काढण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले, समाजातील कुप्रथा, बुवा-बाबांची भोंदूगिरी आणि जातपंचायतींच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अ‍ॅड. रंजना गवांदे, अनेक विक्रम करणाऱ्या जलतरणपटू ‘सागरकन्या’ रुपाली रेपाळे, एचआयव्ही- एड्सग्रस्त मुलांच्या आई झालेल्या मंगलताई शहा आणि मतिमंद मुलांसाठी ‘घरकुल’ थाटणाऱ्या नंदिनी बर्वे यांना या सोहळ्यात दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार त्यांना नऊ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यात कवी सौमित्र, मिताली विंचूरकर, मेघा राऊत, कौशिकी जोगळेकर, दसक्कर भगिनी आणि ‘संगीत देवभाबळी’ फेम मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते आदींचा सहभाग असलेली साहित्य, संगीताची बहारदार मैफलही अनुभवता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.

कार्यक्रमाचे प्रायोजक

प्रस्तुतकर्ते : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

सहप्रायोजक : एन के जी एस बी को-ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स

पॉवर्ड बाय : व्ही. एम. मुसळूणकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइजर्स लि. पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक, इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा

कधी? : मंगळवार, २२ ऑक्टोबर

सायंकाळी ६.१५ वाजता

कुठे? : स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर (प.)

First Published on October 21, 2019 12:43 am

Web Title: loksatta navdurga honor tomorrow abn 97