News Flash

जागर स्त्रीशक्तीचा, ‘शोध नवदुर्गाचा’!

‘लोकसत्ता’ने गेली तीन वर्षे या स्त्रीशक्तीचा सन्मान केला तो ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाद्वारे.

जागर स्त्रीशक्तीचा, ‘शोध नवदुर्गाचा’!

 

 

नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा सण. वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारी आजची स्त्री सामाजिक बदलांसाठीही ठामपणे उभी राहते आहे. ‘लोकसत्ता’ने गेली तीन वर्षे या स्त्रीशक्तीचा सन्मान केला तो ‘शोध नवदुर्गाचा’ या उपक्रमाद्वारे. यंदाच्या, चौथ्या वर्षीही या उपक्रमाद्वारे समाजातल्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा शोध घेऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. ‘केसरी’ आणि बेडेकर या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

दुष्टांचे निर्दालन करणारी दुर्गा. आपल्या अवतीभवती अशा अनेक दुर्गा आहेत. गेल्या तीन वर्षांत अशा २७ कर्तृत्ववान दुर्गाचा सत्कार करण्यात आला. त्यातील कोणी संशोधन क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी, कोणी जंगल वाचविणारी, कोणी अंध, अपंग, विकलांग रुग्णांची काळजी घेणारी, कोणी स्वत: अंध असूनही अंधांना स्वयंपूर्ण बनविणारी, कोणी विधवांना सन्मानाचे जगणे देणारी, तर कोणी भ्रूणहत्या, कर्करोगाविरोधात जनजागृती करणारी दुर्गा. अशा अनेक नवदुर्गा समाजात निरपेक्ष भावनेने काम करत आहेत.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, तंत्रज्ञान, विज्ञान, मनोरंजऩ, उद्योग किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो. उच्च ध्येय समोर ठेवून नियमित किमान पाच वष्रे ठोस विधायक कार्य करणाऱ्या तुमच्या आमच्यातल्याच स्त्रीशक्तीला समाजापुढे आणण्याचा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणे हा या उपक्रमाचा हेतू. वाचकांनी पाठवलेल्या माहितीतूनच या उपक्रमासाठी असामान्य कर्तृत्व केलेल्या नऊ  ‘दुर्गा’ची निवड करण्यात येणार आहे. चला तर, नवदुर्गाच्या शोधात सहभागी व्हा!

शोधात सहभागासाठी..

  • ‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमासाठी एका वेळी एकाच कर्तृत्ववान स्त्रीची माहिती ३०० शब्दांत एकदाच पाठवायची आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांनी केलेली मुख्य कामे अधोरेखित करावीत. त्यांना पुरस्कार मिळाले असल्यास त्यांचा स्पष्ट उल्लेख करावा. या ‘दुर्गे’चे संपूर्ण नाव, पत्ता, ईमेल आयडी, पासपोर्ट छायाचित्र, मोबाइल क्रमांकही सोबत पाठवावा. आपण पाठवलेली माहिती पूर्णत: सत्य असावी.
  • माहिती ईमेलद्वारे अथवा कुरिअर वा टपालाने आमच्या कार्यालयीन पत्त्यावर १० सप्टेंबपर्यंत पाठवणे आवश्यक.
  • या उपक्रमामधून फक्त नऊ ‘दुर्गा’चीच निवड करण्यात येणार असून, अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल. तसेच यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार, दूरध्वनी संवाद केला जाणार नाही. पत्रावर ‘शोध नवदुर्गेचा’ आवर्जून लिहावे.

आमचा पत्ता

लोकसत्ता ‘शोध नवदुर्गाचा, ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई ४००७१०.

किंवा loksattanavdurga-@gamil.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 4:13 am

Web Title: loksatta navdurga program women special
Next Stories
1 ‘न्यू भेंडीबाजारा’त १७ उत्तुंग टॉवर, मॉल!
2 बोरिवलीकरांची गाळाने गाळण
3 ‘ब्रिमस्टोवॅड’ची आठवण!
Just Now!
X