‘लोकसत्ता नवरात्रोत्सव २०१७’मधून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी

नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्रीत भक्तीसोबत रंग आणि आनंदाची उधळण होत असते. हाच आनंद द्विगुणित करून यंदाच्या उत्सवाचे रंग अधिक गडद करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘नवरात्रोत्सव २०१७’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. ‘रामबंधू चिवडा मसाला’ प्रस्तुत ‘लोकसत्ता नवरात्रोत्सव २०१७’ या स्पर्धेतून पारंपरिक आणि मंगळागौरीच्या खेळांची तसेच दिवाळीचे तिखट पदार्थ बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यातून स्पर्धकांना  बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

गेल्या काही वर्षांपासून नवरात्रोत्सव सादरीकरणात बदल झाला आहे. पूर्वी केवळ दांडिया आणि गरब्यापुरता सीमित असलेल्या या उत्सवात आता मंगळागौर, भोंडला असे मराठमोळे खेळही रंग भरू लागले आहेत. नवरंग आणि नवभक्तीने भारलेल्या नवरात्रोत्सवाचा हाच बदल टिपून ‘लोकसत्ता नवरात्रोत्सव स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असून यात मंगळागौर व पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली या शहरांतील निवडक नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेतून स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत. २१ ते २९ सप्टेंबर या कालावधीत दादर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, विलेपार्ले, कांदिवली या भागांतील नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी सायंकाळी ६ ते ९  या वेळेत ‘लोकसत्ता’चा चमू भेटीला येणार आहे. या ठिकाणी दिवाळीच्या तिखट पदार्थाची फराळ स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.

रामबंधू चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता नवरात्रोत्सव २०१७’ या स्पर्धेचे सहप्रायोजक केसरी व ‘पॉवर्ड बाय’ प्रायोजक एम. के. घारे ज्वेलर्स असून जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड बँकिंग पार्टनर आहे.