महाभारतात रणभूमीवरून आयत्या वेळी कच खाणाऱ्या पार्थाला अमोघ वाणीने गीतेचे अमृत पाजणाऱ्या कृष्णापासून ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत वक्तृत्व कलेची ताकद दिसून आली आहे. शब्द, विचार आणि स्मरण या तीन शक्तींचा ठाव असलेल्या या कलेचा जागर येत्या २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या नावाने महाविद्यालयीन जगतात प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा राज्यभरातील विचारी तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे.

आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगायचे असते. वक्तृत्व कलेने या सांगण्याला धार मिळते. कारण बोलणे हा उपचाराचा भाग नसतोच कधी. त्यातून भाषा, संस्कृती, विचार, साहित्य असे सगळेच आविष्कृत होत असते. त्यातून महाराष्ट्राला तर ओजस्वी व ओघवत्या वक्तृत्वाची दमदार परंपरा लाभलेली. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर.. नावे घ्यावी तितकी थोडी. आपली हीच परंपरा जतन करण्याकरिता ‘लोकसत्ता’ सरसावला असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क..

मुंबई – युसूफ कोलंबोवाला- ९९२०७९३३५५, मणिंदर सिंह- ९९११५८३३७७. नवी मुंबई- समीर म्हात्रे- ९०२१७८३४०८. ठाणे- कमलेश पाटकर- ९८२०६६४६७९, मिलिंद दाभोळकर- ९१६७२२१२४६. पुणे- अमोल गाडगीळ- ९८८१२५६०८२. नाशिक- वंदन चंद्रात्रे- ९४२२२४५०६५, ९२२५११३९८३. नागपूर (शहर)- गजानन बोबडे- ९८२२७२८६०३. रत्नागिरी- हेमंत चोप्रा- ९४२२०५२४७६, ९४२००९५१०४. विदर्भ- शरद भुते- ९०९६०५०७४०. औरंगाबाद- सदाशिव देशपांडे- ९९२२४००९७६. कोल्हापूर- संदीप गिरीगोसावी- ९६५७२५५२७७.

स्पर्धा कशी होणार? : स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे विषय सोमवारच्या ‘लोकसत्ता’च्या अंकात जाहीर केले जातील. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक असलेला कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातील आणि १६ ते २४ या वयोगटांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ  शकेल. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. आठही विभागांतून निवडण्यात आलेल्या वक्त्यांची महाअंतिम फेरी मुंबईत १७ मार्चला रंगणार आहे.

प्रायोजक.. : ‘पितांबरी कंठवटी’ प्रस्तृत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धुतपापेश्वर व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.