04 March 2021

News Flash

‘वक्ता दशसहस्रेषु’ची प्राथमिक फेरी आजपासून

प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील.

मुंबई : महाराष्ट्रातील वक्तृत्वाच्या तेजस्वी परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारी नाशिकपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचे हे पाचवे पर्व आहे. तरुणाईच्या वक्तृत्व गुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, २६ फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

समाजामध्ये काळानुरूप होणाऱ्या बदलांची सध्याच्या तरुण वर्गाने केलेली नोंद, विविध क्षेत्रातील घडामोडींमुळे त्यांच्या मनात उठणारी वादळे, निर्माण होणारे प्रश्न आणि याची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या पातळीवर केलेले उत्खनन या वैचारिक मंथनाची घुसळण या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमुळे राज्यभरातील तरुण विचारवंतांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्राथमिक फेरीतून निवडण्यात आलेले वक्ते विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. आठही विभागांतून निवडण्यात आलेल्या वक्त्यांची महाअंतिम फेरी मुंबईत १७ मार्चला रंगणार आहे.

‘पितांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धुतपापेश्वर व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक असलेला कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातील आणि १६ ते २४ या वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ  शक तील. ही स्पर्धा एकूण आठ केंद्रांवर तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे.

प्राथमिक फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

विभाग            तारीख            स्थळ                                                                       वेळ

नाशिक           २६ फेब्रुवारी  कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक                   स. ९.३० वा.

औरंगाबाद      १ मार्च  देवगिरी कॉलेज, औरंगाबाद                                               स. १० वा.

मुंबई               २ व ३ मार्च   मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट                                  स. १० वा.

ठाणे               २ व ३ मार्च   ज्ञानसाधना शाळा, मनोरुग्णालयाजवळ (ठाणे प.)     स. १० वा.

कोल्हापूर       ५ मार्च  विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर                                   स. ११ वा.

नागपूर           ५ व ६ मार्च    सवरेदय आश्रम                                                          स. १० वा.

रत्नागिरी       ५ मार्च  डॉ.जे.एस.केळकर सभागृह (सेमिनार हॉल), गोगटे जोगळेकर महाविद्यालय      स. १० वा.

पुणे                 ७ मार्च गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (न्यू बिल्डिंग), कर्वे रोड, पुणे     स. ९.३० वा.

चार विषय

‘मी-टू’ पणाची बोळवण, ‘क्लोनिंग: माकडानंतर माणूस’, ‘चरित्रपटांचे चारित्र्य’, ‘खेळ की नायक’ हे या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चार विषय आहेत. या विषयांचा चौकस, र्सवकष विचार करणे अपेक्षित आहे. सामाजिक जाणिवा जागृत होतील, अशा वैविध्यपूर्ण आणि अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विषयाचे सादरीकरण तरुण विचारवंतांनी करावे. स्पर्धेच्या नियम, अटी व प्रवेश अर्जासाठी लॉग ऑन करा – http://www.loksatta.com/vaktrutva-spardha-2019

अधिक माहितीसाठी संपर्क

* मुंबई – युसुफ कोलंबोवाला – ९९२०७९३३५५, अमित जाधव -७९७७२४२४८५, प्रदीप पांडे – ९८९२६८७०१०, सुभाष कदम -९७६९३६८१११.

*  नवी मुंबई – समीर म्हात्रे – ९०२१७८३४०८.

* ठाणे – कमलेश पाटकर – ९८२०६६४६७९, मिलिंद दाभोळकर – ९१६७२२१२४६, सुधीर दळवी – ७७९८६००३४८.

* पुणे – अमोल गाडगीळ – ९८८१२५६०८२. ’ नाशिक – वंदन चंद्रात्रे – ९४२२२४५०६५, ९२२५११३९८३.

* नागपूर (शहर) – गजानन बोबडे – ९८२२७२८६०३.

* रत्नागिरी – हेमंत चोप्रा – ९४२२०५२४७६, ९४२००९५१०४.

* विदर्भ – शरद भुते – ९०९६०५०७४०.

* औरंगाबाद – सदाशिव देशपांडे – ९९२२४००९७६.

* कोल्हापूर – संदीप गिरीगोसावी  ९६५७२५५२७७.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 12:05 am

Web Title: loksatta oratory competition 2019 primary round start today
Next Stories
1 मूकबधिर आंदोलनकर्त्यांवरील लाठीमारची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मागितला सखोल अहवाल
2 स्वमग्न मुलांची अशीही एक संध्याकाळ !
3 राफेलप्रकरणी पर्रिकरांनी पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल केले : पृथ्वीराज चव्हाण
Just Now!
X