26 January 2021

News Flash

शुभकार्याच्या ‘श्रीगणेशा’चा आनंद ‘लोकसत्ता’सोबत

भाविकांच्या मनावर राज्य करणारा सार्वभौम राजा अशा शब्दांत श्रीगणेशाची महती सांगता येईल.

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता सेलिब्रेशन मोमेंट्स’ स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांना आकर्षक बक्षीसे

कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ‘श्रीगणेशा’ला वंदन करून केली जाते. म्हणून एखादे चांगले कार्य करताना त्याचा ‘श्रीगणेशा’ केला, असे आपण सहज म्हणून जातो. एखाद्या समाजाभिमुख संकल्पाचा ‘श्रीगणेशा’ करण्याकरिता गणेशोत्सवासारखा दुसरा मुहूर्त नाही. म्हणूनच ‘लोकसत्ता’ यंदा गणेशभक्तांकरिता ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘सेलिब्रेशन मोमेंट्स, २०१८’ घेऊन आला आहे. यातील विजेत्या गणेशभक्तांना आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत.

भाविकांच्या मनावर राज्य करणारा सार्वभौम राजा अशा शब्दांत श्रीगणेशाची महती सांगता येईल. आपल्याकडे कुठल्याही कार्यात अग्रपूजेचा मान गणपतीला असतो. कार्य लग्नाचे असो वा मुंजीचे; विद्येच्या या देवतेचे अधिष्ठान अनेकांच्या वह्य़ा-पुस्तकांवर ‘श्री’च्या रूपानेही दिसून येते. श्रीगणेशाचे हे महत्त्व अधोरेखित करण्याकरिता ‘लोकसत्ता’च्या वतीने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यात सहभागी होण्याची प्रक्रियाही सोपी आहे.

 

‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता सेलिब्रेशन मोमेंट्स, २०१८’करिता भाविकांना त्यांच्या कुटुंबासमवेत गणेश उत्सव साजरा करतानाचे छायाचित्र पाठवायचे आहे. हे छायाचित्र loksattagums2018@gmail.com या संकेतस्थळावर स्वीकारले जाईल. याचबरोबर या गणेश उत्सवादरम्यान सुरू  केलेला समाजाभिमुख संकल्प किंवा कार्य यांची १५० शब्दांत माहिती द्यायची आहे. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर आदी माहितीही पाठवायची आहे. या स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांची छायाचित्रे ‘लोकसत्ता’त प्रकाशित होतील, तसेच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीदेखील मिळेल. या संकेतस्थळावर स्वीकारले जाईल. याचबरोबर या गणेश उत्सवादरम्यान सुरू  केलेला समाजाभिमुख संकल्प किंवा कार्य यांची १५० शब्दांत माहिती द्यायची आहे. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर आदी माहितीही पाठवायची आहे. या स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांची छायाचित्रे ‘लोकसत्ता’त प्रकाशित होतील, तसेच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीदेखील मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 4:06 am

Web Title: loksatta organizing loksatta celebration moments competition
Next Stories
1 ‘हतबल’ पालिका न्यायाच्या खिंडीत!
2 बेस्टची वीज स्वस्त, महावितरणची पाच टक्के महागली
3 दुर्घटनेस दोन्ही पबचे मालकच जबाबदार
Just Now!
X