News Flash

‘स्पर्धापरीक्षा गुरू’ उद्यापासून!

यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धापरीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून प्रशासकीय सेवांमध्ये मराठी टक्का वाढावा

‘स्पर्धापरीक्षा गुरू’ उद्यापासून!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धापरीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून देशाच्या आणि राज्याच्या प्रशासकीय सेवांमध्ये मराठी टक्का वाढावा, याकरता दै. लोकसत्तामध्ये ‘स्पर्धापरीक्षा गुरू’ ही दैनंदिन लेखमालिका शनिवारी, ५ मार्चपासून सुरू करीत आहोत. सुमारे महिनाभर सुरू राहणाऱ्या या लेखमालिकेत दररोज यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांविषयी मार्गदर्शनपर सदर प्रसिद्ध होईल. यात यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांचे अद्ययावत स्वरूप, अभ्यासक्रम, आधीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सरावासाठी प्रश्न आणि अभ्यासाचे मंत्र असा भरगच्च मजकूर देण्यात येणार आहे. यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धापरीक्षांमध्ये यश संपादन करण्याकरता आवश्यक ठरणाऱ्या विविध बाबींचा सविस्तर ऊहापोह या दैनंदिन लेखमालिकेत करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 3:25 am

Web Title: loksatta program on competitive examination
टॅग : Loksatta
Next Stories
1 शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश नाकारणाऱ्या प्रथेविरोधात उच्च न्यायालयात याचिका
2 मुंबई विद्यापीठात ऑनलाइन एमबीए
3 पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता समुद्राचा आधार
Just Now!
X