29 September 2020

News Flash

महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा प्रसार करा

महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती ही त्या त्या प्रांतातल्या स्वयंपाकगृहात बंदिस्त न राहता तिचे ‘मार्केटिंग’ आक्रमकपणे झाले पाहिजे.

लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या खाद्य वार्षिकाच्या निमित्ताने गुरुवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात गुरुवारी संध्याकाळी खाद्य मैफल रंगली. पाककृतींची ओळख करुन देणारे मोहसिना मुकादम, मंजिरी कपडेकर, आशालता पाटील, सायली राजाध्यक्ष आणि विष्णू मनोहर हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला मुंबईकर खवय्यांनी  गर्दी केली होती.  (छाया-दिलीप कागडा)

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’मध्ये नामवंत शेफचा सल्ला; प्रकाशनाला खवय्यांची गर्दी

महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती ही त्या त्या प्रांतातल्या स्वयंपाकगृहात बंदिस्त न राहता तिचे ‘मार्केटिंग’ आक्रमकपणे झाले पाहिजे. आजच्या तरुणाईला आपलीशी आणि आकर्षक वाटतील अशी नावे देऊन हे पदार्थ सहजरित्या उपलब्ध झाले पाहिजेत. तरच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या ताटात पोहोचेल, असा दृष्टीकोन ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’मध्ये पाचही लेखक, खाद्य अभ्यासकांनी मांडला.

‘विम’ प्रस्तूत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या खाद्य वार्षिकाच्या निमित्ताने दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात गुरुवारी संध्याकाळी खाद्य मैफिल रंगली. ठाणे आणि पुणे येथील कार्यक्रमाणे मुंबईकर खवय्यांनी या कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या अंकात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खांदेश, मराठवाडा आणि विदर्भ या पाचही प्रांतांमधील पाककृतींची ओळख करुन देणारे मोहसिना मुकादम, मंजिरी कपडेकर, आशालता पाटील, सायली राजाध्यक्ष आणि विष्णू मनोहर हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

खाद्यसंस्कृती ही भूगोलामुळे ठरते. कोकणात भात, मासे आणि नारळ हे प्रसिद्ध असले तरी व्यापारी, मुघल, आक्रमक अशा परकीयांच्या खाद्य संस्कृतीचा प्रभावही कोकणावर पडला. तसेच मुंबईची खाद्यसंस्कृती अठरापगड जातींच्या विविधतेमुळे निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कोकणातील खाद्यसंस्कृतीबद्दल बोलताना मोहसिना मुकादम यांनी केले.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार करताना सोलापूरवर मराठवाडय़ाच्या आणि कोल्हापूरवर कोकणाच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव पडला आहे. सोलापुरी सावजी आणि कोल्हापुरातला पेंडपाला या पदार्थामुळे पश्चिम महाराष्ट्राला वेगळी ओळख मिळवून दिली आहे, असे मंजिरी कपडेकर यांनी सांगितले.

वरणबट्टी, वांग्याचे भरीत, शेवेची खमंग भाजी हे खांदेशातील पारंपरिक पदार्थ खाण्यासाठी खांदेशलाच यावे लागेल, असे आशालता पाटील यांनी नमुद केले. तर मराठवाडय़ात ज्वारी दास्त पिकते. त्यामुळे येथील पदार्थात ज्वारीचा वापर अधिक होतो. तसेच कडधान्यांच्या अभावामुळे प्रथिनांचे प्रमाण भरुन काढण्यासाठी विविध डाळी वापरल्या जातात, असे सायली राजाध्यक्ष यांनी सांगितले. मात्र येथील पदार्थाचे ‘मार्केटिंग’ होत नसल्याने मराठवाडी खाद्यसंस्कृती महाराष्ट्रभर पोहोचलेली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. विदर्भातील काद्यसंस्कृतीवर मध्य प्रदेश आणि तेलंगणा यांचा प्रभाव जास्त आहे. भाताचे विविध प्रकार, लंबीरोटी असे काही खास पदार्थ वऱ्हाडी खाद्यसंस्कृतीचे वैशिष्टय़ आहेत, असे विष्णू मनोहर यांनी नमुद केले.

तू, पी किंवा खा..

गप्पांच्या ओघात विष्णू मनोहर यांनी ‘नटसम्राट’ या नाटकातील ‘टू बी ऑर नॉट टू बी’ या उताऱ्याच्या धर्तीवर ‘तू, पी किंवा खा – दॅट इज द क्वेश्चन’ असा फर्मास उतारा सादर केला. रसिकांनीही विष्णूजींना दाद दिली.

‘विम’ प्रस्तूत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ सहप्रायोजक ‘लालजी गोधू अ‍ॅण्ड कंपनी’, टेस्ट पार्टनर ‘राम बंधू’, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, आयुशक्ती, ‘केसरी’ आणि टेलिव्हीजन पार्टनर ‘कलर्स मराठी’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:10 am

Web Title: loksatta purnabramha 2
Next Stories
1 पुन्हा मनसेचा विकास आराखडा
2 Bjp Shiv sena alliance: युतीच्या वादाचे माहीत नाही, पण देशात वाघ वाढायला हवेत
3 मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस शिष्टमंडळाला वेळ
Just Now!
X