13 December 2017

News Flash

सकस वाचनाचा समृद्ध आविष्कार!

हल्ली वाचते कोण असे म्हणत साबणाच्या वड्यांसारखी गुळगुळीत, उथळ वृत्तपत्रे काढून मराठी वाचकांचा, येथील

मुंबई | Updated: December 31, 2012 2:32 AM

नव्या वर्षांत नवे रूप,नवे लेखक, नवे स्तंभ, वैचारिक परंपरेतले पुढचे पाऊल
हल्ली वाचते कोण असे म्हणत साबणाच्या वड्यांसारखी गुळगुळीत, उथळ वृत्तपत्रे काढून मराठी वाचकांचा, येथील तेजोमय तरुणाईचा अपमान ज्यांना करायचा आहे, त्यांनी तो खुशाल करावा. ‘लोकसत्ता’ने मात्र नेहमीच मराठी प्रौढ-अनुभवी वाचकांच्या, सळसळत्या तरुणांच्या विचारबुद्धीवर विश्वास ठेवत समृद्ध व सकस वाचनपरंपरेची मशाल तेवती ठेवली आहे! या परंपरेला जागूनच लोकसत्ताने सरत्या वर्षांप्रमाणेच नव्या वर्षांतही मराठीतील काही उत्तम, नामवंत लेखक आपल्या वाचकांच्या भेटीस आणले आहेत. नव्या वर्षांत ही ‘लोकमान्य लोकशक्ती’ अधिक आकर्षक रूपरंगात तर येत आहे, पण आपल्या रोजच्या जगण्याला अर्थ लावण्यास सा करणाऱ्या नव्या दर्जेदार सदरांचा नजराणाही लोकसत्ताने आणला आहे.

अग्रलेखाच्या पानाचे मानकरी
ताज्या, सखोल, वाचकांच्या जीवनलढाईशी निगडित असलेल्या आणि सनसनाटी नव्हे, तर सणसणीत बातम्या हे जसे लोकसत्ताचे वैशिष्ट्य आहे, त्याचप्रमाणे अग्रलेखाचे पान हा मानिबदू आहे. नव्या वर्षांत या पानाचे मानकरी असतील झुंजार शेतकरी नेते शरद जोशी व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर. याशिवाय घटना-घडामोडींच्या विश्लेषणातील गरसमजांचा समाचार घेणारे ‘गल्लत-गफलत-गहजब’ हे राजीव साने यांचे सदरही या पानावर असेल. याबरोबर दरदिवशी असेल डॉ. रवीन थत्ते यांचे आशयगर्भ चिंतन.  इंग्रजीतील उत्तम ग्रंथांना वाहिलेले अग्रलेखाचे पान दर शनिवारी.

लोकरंगचे नवे रंग
लक्षावधी मराठी घरांमध्ये रविवार रंगतो तो ‘लोकरंग’सवे! नव्या वर्षांत लोकरंगचे रंग अधिक खुलणार आहेत ते सुधीर मोघे, कमलाकर नाडकर्णी, आनंद मोडक, सतीश राजवाडे, शरद वर्दे, डॉ. राजीव शारंगपाणी, डॉ. अद्वैत पाध्ये या मान्यवरांच्या लेखमालांनी. कविता, नाटक, गाणी, विनोद ते देह-मनाच्या आरोग्यापर्यंतच्या विषयांना वाहिलेल्या या सदरांबरोबर नव्या वर्षांतील लोकरंगचे वैशिष्ट्य असेल ते जागतिकीकरणाबद्दल सवयीनुसार गळे न काढता, पण त्याने झालेले बदल टिपणारे ‘उद्धारपर्व’ हे सदर. त्याचप्रमाणे मराठीतील विविध बोलीभाषांची ओळख करून देणारे गंभीर आणि गमतीदार असे ‘मायबोली’ हे सदरही नव्या वर्षांत आपणांस वाचावयास मिळणार आहे.

चतुरंगचा नवा साज
तरुणींची ही सखी तशी अवघ्या कुटुंबाचीच लाडकी! ती नव्या वर्षांत अधिक आकर्षक साजात, बदललेल्या रुपात येत आहे. नव्या वर्षांत चतुरंगमध्ये आपणांस भेटणार आहेत वासंती वर्तक, वंदना अत्रे, जयमती दळवी, अमृता सुभाष, मंगला गोडबोले, गौरी कानिटकर, डॉ. शशांक सामक, जेसिका सामक, डॉ. लीली जोशी, अनुराधा गोरे, डॉ. श्रुती पानसे, डॉ. वर्षां दंडवते, प्रा. प्रकाश जकातदार ही आपापल्या क्षेत्रातली मातब्बर मंडळी. व्यक्ती, कुटुंब ते समाज अशा सर्वच स्तरांचा, आयुष्यातील विविध टप्प्यांचा, त्यातील विविध अनुभवांचा, समस्यांचा वेध घेणारे सखोल माहितीपूर्ण लेख हे नव्या वर्षांतील चतुरंगचे वैशिष्ट्य ठरणार आहेत.

First Published on December 31, 2012 2:32 am

Web Title: loksatta ready fro new writer new design from new year
टॅग Loksatta