मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे

मुंबईच्या विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने मुंबईचा नियोजनबद्ध विकास आणि परवडणारी घरे या मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून मंगळवार, ७ ऑगस्टला ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह-२०१८’ आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजोय मेहता हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अस्ताव्यस्त फोफावलेल्या मुंबईच्या विस्ताराला फारसा वाव नसला तरी इथली रिअल इस्टेट बाजारपेठ प्रचंड तेजीत असते. मुंबईच्या विकास आराखडय़ानुसार नियोजनबद्ध विकास करतानाच परवडणाऱ्या घरांचा मुद्दाही निकाली काढावा लागणार आहे. त्यासाठीच ‘मुंबईचा विकास आराखडा २०३४ व परवडणारी घरे’ या विषयावर ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आले आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. राज्य सरकार आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यात थेट संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल.

बिर्ला व्हाईट प्रस्तूत ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह२०१८’चे सहप्रायोजक एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड असून, बॅंकींग पार्टनर युनियन बॅंक ऑफ इंडिया आहे. कॉन्क्लेव्हमध्ये बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. राज्य सरकार आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यात थेट संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल. बिर्ला व्हाईट प्रस्तुत ‘लोकसत्ता रिअल इस्टेट कॉन्क्लेव्ह२०१८’चे सहप्रायोजक एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड असून, बॅंकींग पार्टनर युनियन बॅंक ऑफ इंडिया आहेत. प्रवेश निमंत्रितांसाठीच आहे.