21 September 2020

News Flash

यूपीएससी गुणवंताशी सोमवारी संवाद

येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल.

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यातील उमेदवारांनी त्यात चमकदार कामगिरी केली. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे पहिल्याच प्रयत्नात यश मिळविणाऱ्या गुणवंतांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. बीडमधील अवघ्या तेवीस वर्षांच्या मंदार पत्की याच्या यशाचे सध्या जोरदार कौतुक होत आहे. त्याच्या अभ्यास नियोजनाबाबत सर्वाना असलेले कुतूहल ‘लोकसत्ता स्पर्धा परीक्षा गुरू’ वेबसंवादातून शमवता येणार आहे. येत्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल. मंदारने यूपीएससीच्या परीक्षेत देशभरातून २२वा क्रमांक पटकावला आहे.

वेबसंवादात सहभागी होण्यासाठी : https://tiny.cc/SpardhaParikshaGuru_10Aug येथे नोंदणी आवश्यक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:40 am

Web Title: loksatta spardha pariksha guru mandarpatki abn 97
Next Stories
1 चर्चेनंतरच परीक्षा रद्द!
2 पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकार विरुद्ध मंत्री
3 करोनाविरोधातील उपाययोजनांचा आढावा
Just Now!
X