भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनेखरेदी ही प्रत्येक कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि या खरेदीसाठी खास मुहूर्तही आहेत. गुरुपुष्यामृत योग हा त्यापैकीच एक. आज, गुरुवारी असलेल्या गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधत दिवाळीपर्यंत सोनेखरेदीचा आनंद लुटण्यासाठी लोकसत्ताने सुवर्ण लाभ योजना आणली आहे. ही योजना १६ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
लोकसत्ता सुवर्ण लाभ योजनेत सहभागी असलेल्या ज्वेलरी शॉपमधून ग्राहकांनी २६ ऑक्टोबरपर्यंत तीन हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची सोनेखरेदी करायची आहे. तीन हजार रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक प्रवेशिका दिली जाणार आहेत. तीन हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यापटीत प्रवेशिका मिळतील. या प्रवेशिकांमध्ये आवश्यक माहिती भरून ती ड्रॉप बॉक्समध्ये टाकायची आहे. योजनेच्या अखेरच्या दिवशी या योजनेत सहभागी असलेल्या दुकानांमधून सर्व प्रवेशिका जमा केल्या जातील. सर्व प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्याची निवड केली जाईल. सुवर्ण लाभ योजनेतील विजेत्यांची नावे लोकसत्तामधून जाहीर केली जातील. विजेत्यांना कार, सहल, एलईम्डी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारखी आकर्षक बक्षिसे दिली जातील. रोझा बिल्डर्स आणि महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ हे या उपक्रमाचे सहभागीदार आहेत. लागू बंधू, वामन हरी पेठे, जे के, कौस्तुभ टूर्स, त्रिभुवनदास भिमजी ज्वेलर्स, चिंतामणी, वामन हरी पेठे सन्स, सेन्को, छेडा ज्वेल्स, विष्णु शांताराम ज्वेलर्स, श्री नेमीनाथ ज्वेलर्स आणि चिंतामणी हेसुद्धा या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. या सुवर्ण लाभ योजनेसाठी नियम व अटी लागू आहेत.