‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेला धडाक्यात सुरुवात

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सोनेखरेदी करणे हे नेहमीच शुभ मानले जाते. मात्र यंदाच्या सोनेखरेदीचा आनंद केवळ यापुरताच मर्यादित न राहता तो द्विगुणित करण्याची संधी ग्राहकांना लाभणार आहे. सोनेखरेदीवर बक्षिसे जिंकण्याची संधी देणारी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजना’ २७ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून या योजनेतून एलईडी टीव्हीपासून सहलीपर्यंतची आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत. ही योजना ८ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे.

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त  कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना ‘लकी कूपन’ दिले जाणार आहे. ग्राहकांनी हे कूपन भरून दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा करायचे आहे. योजनेच्या शेवटच्या दिवशी योजनेत सहभागी असलेल्या दुकानांमधून सर्व कूपन्स जमा केले जाणार आहेत. सर्व कूपन्स एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या विजेत्यांना सहल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ए.सी. अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.