सोनेखरेदीच्या आनंदासह बक्षिसांची उधळण

सोनेखरेदीच्या आनंदासह भरघोस बक्षिसांची उधळण करणाऱ्या ‘रिजन्सी ग्रुप’ प्रस्तुत व असोसिएट पार्टनर ‘महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ’ आणि ‘केसरी’ यांच्या तर्फे होणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ या योजनेची आजपासून सुरुवात होत आहे. सोनेखरेदीसह बक्षिसांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी ही सुवर्ण परंपरा ‘लोकसत्ता’ पुढे नेत आहे. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ग्राहकांना यात सहभाग घेता येणार आहे.

Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज
india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर
penalty for car washes in bangalore
तहानलेल्या बंगळूरुमध्ये वाहने धुणाऱ्यांना दंड

या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना सोने व सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या दुकानांतून योजनेच्या कालावधीत ३ हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा दागिने खरेदी करायचे आहेत. ग्राहकांनी खरेदी कलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना ‘लकी कूपन’ दिले जाणार आहे. कूपन भरून दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा करायचे आहे. या योजनेच्या शेवटच्या दिवशी योजनेत सहभागी असलेल्या दुकानांमधून सर्व कूपन जमा केली जाणार आहेत. सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मध्ये जाहीर होतील. विजेत्यांना कार, परदेशी सहल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचे, प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू, गोल्ड पार्टनर श्री नेमिनाथ ज्वेलर्स, सावंत ज्वेलर्स, वामन हरी पेठे ज्वेलर्स, एम. के. घारे ज्वेलर्स, सिल्व्हर पार्टनर चिंतामणी ज्वेलर्स, गिफ्ट पार्टनर डॉ. त्वचा आणि स्काय लार्क यांचे सहकार्य लाभले आहे.