News Flash

‘लोकसत्ता तरुण तेजांकितां’ची आज घोषणा

तरुणांमधील असामान्यत्वाचा गौरव

(संग्रहित छायाचित्र)

आपल्या कौशल्याने आणि प्रगल्भतेने विविध क्षेत्रांत ठाशीव कामगिरी करणाऱ्या तरुणाईचा गौरव करणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळा आज, शनिवारी रंगणार आहे. केंद्रीय पर्यावरण आणि माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते तरुण तेजांकितांचा गौरव करण्यात येणार आहे.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराचे हे तिसरे पर्व आहे. संशोधन, सामाजिक कार्य, नवउद्यम, व्यवसाय, कला आणि मनोरंजन, कायदा आणि सुशासन आदी क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे युवक यात सहभागी झाले. अशा अनेक गुणवंतांमधून तज्ज्ञ समितीने निवडलेल्या तरुण तेजांकितांचा हा सन्मानक्षण करोनाकाळातील सर्व निर्बंधांचे पालन करून पार पडणार आहे. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराचे मानकरी नेमके कोण आहेत हे कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे.

मनोरंजनाची मेजवानी…

या कार्यक्रमात एकपात्री विनोदकार सावनी वझे सादरीकरण करणार आहेत. भाडिपाच्या कार्यक्रमांमध्ये सावनीचा सहभाग असतो. तसेच दूरचित्रवाणी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले अभिनेते वैभव मांगले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

प्रायोजक  : मुख्य प्रायोजक – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), सहप्रायोजक – सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.,

वर्ल्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको,

पॉवर्ड बाय- एम. के. घारे ज्वेलर्स, नॉलेज पार्टनर – प्राइस वॉटर हाऊस कुपर्स, टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:27 am

Web Title: loksatta tarun tejankit announcement today abn 97
Next Stories
1 सेवा करदात्यांवर अविश्वास
2 ‘रेमडेसिवीर’च्या किमतीत घट
3 केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक