07 March 2021

News Flash

सुरांकित.. तरुण तेजांकित..!

अभिजित पोहनकर या फ्यूजन संगीतकाराच्या की बोर्डवर फिरणाऱ्या बोटांची ती जादू होती

अभिजित पोहनकर या फ्यूजन संगीतकाराच्या की बोर्डवर फिरणाऱ्या बोटांची ती जादू होती..

ऐन वसंतातील रम्य सायंकाळ. स्थळ – परळमधील एक प्रशस्त पंचतारांकित दालन. सामाजिक, राजकीय, आर्थिक, प्रशासन, उद्योग, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन.. आदी विविध क्षेत्रांतील निमंत्रित नामांकितांची गर्दी. अभिनेते जितेंद्र जोशी यांनी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि त्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण सभागृहात किरवाणी रागाचे सूर दाटून आले. अभिजित पोहनकर या फ्यूजन संगीतकाराच्या की बोर्डवर फिरणाऱ्या बोटांची ती जादू होती.. त्या तेजोमय संगीताने मनावरून मोरपिसे फिरत असतानाच मंचावर अवतरले मरुभूमी राजस्थानातील लोकसंगीत. केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळ्याच्या या सुरांकित प्रारंभानंतर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि ख्यातनाम उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या हस्ते १२ तरुण तेजांकितांचा गौरव करण्यात आला. शनिवारी, ३१ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली ती पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने..

‘एबीपी माझा’वरून आज प्रक्षेपण

वेळ : सकाळी १० ते ११

आणि रात्री ९ ते १०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 1:01 am

Web Title: loksatta tarun tejankit award 2018 to show on abp majha news channel
Next Stories
1 पोटनिवडणुकीच्या वादातून अहमदनगरमध्ये गोळीबार, दोन शिवसैनिकांची हत्या
2 नाशिक मनपा पोटनिवडणुकीत मनसेची बाजी!
3 पुण्यात लॉक अपमध्ये असलेल्या दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X