भारताचा जीडीपी जगात दुस-या क्रमांकावर होता. जगाच्या जीडीपीमध्ये २४ टक्के वाटा भारताचा होता. आता हा वाटा २ टक्के आहे. तरूणांनी देशाचा विचार करावा. ४०० वर्षांपूर्वी भारत समृद्ध श्रीमंत देश होता तसाच देश बनवायचा प्रयत्न तरूणांनी करावा असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांनी लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार सोहळयात बोलताना केले.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. इंजिनीअर झालो. उद्योगात आलो आणि आज जगात ८-९ कारखाने भारत फोर्जचे आहेत. मर्सिडिझच्या प्रत्येक गाडीत आमचा पार्ट आहे. या कार्यक्रमात बोलताना काहीही करायचं असेल तर ध्येय समोर ठेवा असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांनी तरुणांना केले. भारत फोर्ज पहिली भारतीय मल्टिनॅशनल कंपनी असल्याचे त्यांनी सांगितले.