मराठी लोकांना इतिहासात रमायला खूप आवडते. पूर्वीचे जे काही होते ते खूप चांगले असा गैरसमज आपणच कवटाळून बसलो आहोत. पण तो समज चुकीचा आहे. कारण आजच्या वर्तमानातही समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक तरुण मंडळी आपापल्या परिने काम करत आहेत. त्यांचे हे काम इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही तरुणाई आणि त्यांची सकारात्मक ऊर्जा समाजापुढे ठळकपणे आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने तरुण तेजांकित हा उपक्रम सुरू केला असे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी या पुरस्कारामागची भूमिका विषद करताना सांगितले. पुरस्काराची निवड प्रक्रिया कशा प्रकारे निष्पक्ष होती त्याची माहिती गिरीश कुबेर यांनी उपस्थितांना दिली.
#TarunTejankit: ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारामागील संकल्पनेबद्दल बोलताना 'लोकसत्ता'चे संपादक @girishkuber गिरीश कुबेर…https://t.co/ZfyIjh1oZt pic.twitter.com/YKKn3YDXUb
— LoksattaLive (@LoksattaLive) March 31, 2018
पुरस्कारासाठी अशी झाली निवड
वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या चाळीस वर्षांच्या आतील तरुणांकडून ‘लोकसत्ता’ने स्वनामांकनपत्र मागविले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे स्वनामांकनपत्रे ‘लोकसत्ता’कडे आली. यातून अंतिम बारा तरुण तेजांकितांची निवड करण्याचे काम ‘प्राइसवॉटरहाऊसकुपर्स’ या आंतरराष्ट्रीय विश्लेषण संस्थेच्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील एका निष्पक्ष तज्ज्ञ समितीने केले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एलआयटी फायनान्स होल्डिंगचे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, स्नेहालय या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा या निवड समितीत सहभाग होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 31, 2018 8:01 pm