मुंबई  :  ‘फोर्ब्स’  मासिकाने जाहीर केलेल्या भारतातील सर्वोत्तम आणि प्रभावशाली  वकिलांच्या यादीत अ‍ॅड्. युवराज नरवणकर  यांचा  यावर्षी समावेश  के ला आहे.  दरवर्षी  उद्योग क्षेत्रातील नामांकने ‘फोर्ब्स’तर्फे जाहीर केली जातात.  यावर्षी पहिल्यांदाच कायदा क्षेत्राचा समावेश या नामांकनांमध्ये करण्यात आला होता.  नरवणकर यांना दोन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

न्यायालयातील अनुभव, लवाद क्षेत्रातील काम आणि तंत्रज्ञान कायद्यातील प्रभुत्व हे निकष फोर्ब्सच्या नामांकनांसाठी प्रामुख्याने विचारात घेतले गेले.  यावर्षीच्या नामांकन आणि अंतिम निवड  समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन लोकूर,  न्या. ए. के. सिक्री, सहसॉलिसिटर जनरल  ऐश्वर्या भाटी,  सर्वोच्च न्यायालयातील सिद्धार्थ लुथ्रांसह इतर वरिष्ठ अधिवक्ता आणि चार राष्टीय विधि महाविद्यालयांचे कुलगुरू यांचा समावेश होता.  दिल्ली येथे नुकत्याच आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमांमध्ये या नावांची घोषणा करण्यात आली. नरवणकर  सध्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. अनेक  महत्त्वाची प्रकरणे विशेषत: जनहित याचिकांचे कामकाज त्यांनी पाहिले.

Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!