News Flash

आजपासून सर्वत्र उपलब्ध

२०२० सरले.. २०२१ सुरूही झाले. भिंतीवरचे कॅलेंडर बदलते, पण गेल्या वर्षांतील घडलेल्या घटना बदलणे वा पुसणे कधीही शक्य नसते.

(संग्रहित छायाचित्र)

२०२० सरले.. २०२१ सुरूही झाले. भिंतीवरचे कॅलेंडर बदलते, पण गेल्या वर्षांतील घडलेल्या घटना बदलणे वा पुसणे कधीही शक्य नसते. गेल्या वर्षी, २०२० मध्ये जगाला एकाच वेळी थांबवून टाकणाऱ्या करोना विषाणूने थैमान घातले. टाळेबंदी, मुखपट्टी, संसर्गभय यांनी प्रत्येकाचे आयुष्य व्यापले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, शहरांतून गावांत स्थलांतर झाले, माणसांचे लोंढेच्या लोंढे विस्थापित झाले. या साऱ्या घटनांत करोनाने बळी घेताना गरीब आणि श्रीमंत असा सामाजिक भेद पुसून टाकला. या साऱ्या भीतीदायक वातावरणात देशाच्या राजकीय वर्तुळातील घटनांपासून जगाच्या राजकारणात झालेल्या स्थित्यंतराची नोंद; समाजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रांनी तगण्यासाठी केलेले बदल या सगळ्यांचे वृत्तपत्रीय वाचनाद्वारे आपण अप्रत्यक्ष साक्षीदारही ठरलो.

स्मृतीत राहू नयेत अशा प्रसंगांतून गेल्या वर्षी प्रत्येक जण गेला असला, तरी या ऐतिहासिक वर्षांतील महत्त्वपूर्ण घटनांचा दस्तावेज म्हणून ‘वर्षवेध’कडे पाहता येईल. हा वार्षिक अंक आजपासून राज्यात सर्वत्र उपलब्ध होणार आहे.

सर्व ज्ञानेच्छुकांसाठी..

गेल्या वर्षीच्या घडामोडींना उजाळा देणारा हा वार्षिक अंक खरे तर सर्वासाठीच उपयुक्त माहितीचा स्रोत आहे. मात्र, त्यातही शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांतील उमेदवार, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, सामान्यज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक यांच्यासाठी हा अंक म्हणजे २०२० मधील प्रमुख घडामोडींचा संग्रह ठरेल.

ठळक वैशिष्टय़े

* गेल्या वर्षांतील घडामोडींच्या तारीखनिहाय नोंदी

* करोनाने बदललेल्या जगण्याच्या नोंदींचा सचित्र आणि सटीप विभाग

* शेती आणि हवामानाचे बिघडलेले गणित यांवर विशेष लेख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 12:24 am

Web Title: loksatta varsh vedh available everywhere from today abn 97
Next Stories
1 जुन्या प्रकल्पांना नवे बळ!
2 सागरी किनारा मार्गातील अडथळा दूर!
3 ‘मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण हवे’
Just Now!
X