मुंबई : सनदी सेवेसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाटाडय़ा म्हणून ओळख बनलेला तसेच संशोधक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्यांसोबत वर्षभरात जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे कुतूहल असणाऱ्यांना उपयुक्त ‘लोकसत्ता वर्षवेध-२०१९’चा अंक उद्यापासून वाचकांच्या भेटीला येत आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘लोकसत्ता वर्षवेध’चे आज प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती आहे.

वर्तमानाकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहू इच्छिणाऱ्या सुजाण आणि सजग नागरिकांना गतवर्षांतील ठळक नोंदींचे भांडार ‘लोकसत्ता वर्षवेध’द्वारे उपलब्ध करून देण्यात येते.

प्रायोजक : तन्वी हर्बल्स प्रस्तुत, सहप्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), ग्रॅव्हिटास फाऊंडेशन, सिडको, रुनवाल ग्रुप;

पॉवर्ड बाय : एमआयडीसी, व्ही.पी.बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड., केसरी टूर्स, एम. के. घारे ज्वेलर्स, इन्फ्राटेक आणि लक्ष्य अ‍ॅकॅडमी. बँकिंग पार्टनर :  ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेड.