एका घरखरेदीवर दुसरे घर मोफतजिंकायची संधी; इतरही बक्षिसे

घर हे एक स्वप्न असते आणि हे स्वप्न बाळगणाऱ्यांची स्वप्नपूर्ती ‘लोकसत्ता’ ‘वास्तुरंग वास्तुलाभ’ ही योजना करून देऊ शकते. लोकसत्ता ‘वास्तुरंग वास्तुलाभ’ या योजनेत सहभागी होणाऱ्यांना एका घरखरेदीवर दुसरे घर मोफतजिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मोफत घरजिंकण्याबरोबरच वातानुकूलन यंत्र, फ्रिज, परदेश वारी, एलईडी आणि अन्य काही बक्षिसेही जिंकण्याची संधी यात सहभागी होणाऱ्यांना मिळणार आहे.

या योजनेनुसार १८ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत या योजनेत सहभागी झालेल्यांना बांधकाम व्यावसायिकांकडे घर खरेदी करून त्यांची नोंदणी करावयाची आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून या स्पर्धेकरिता जो अर्ज मिळेल तो भरून जमा करायचा आहे. मनासारखे घर प्रत्यक्षात मिळविताना महिनोन् महिने पायपीट करावी लागते. ग्राहकांचा हा त्रास दूर करण्यासाठी ‘वास्तुरंग वास्तुलाभ’ या योजनेअंतर्गत त्यांना एका घर खरेदीवर दुसरे घर मोफत मिळू शकते. ही अतिशय वेगळी योजना असून याचा लाभ उठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेत तुलसी इस्टेट, कर्म इन्फ्रास्ट्रक्चर, थरवानी इन्फ्रास्ट्रक्चर, निसर्ग ग्रुप, रोझा ग्रुप, निलसिद्धी ग्रुप, ग्लोबल कन्स्ट्रक्शन, श्री सावन ग्रुप, सत्यम ग्रुप, क्वालकॉन, स्वागत व्हिलेज, श्री कृपा बिल्डर्स, भक्ती डेव्हलेपर्स हे सहभागी झाले आहेत. दिलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पासंदर्भात अधिक माहिती शनिवारच्या ‘वास्तुरंग’ पुरवणीत मिळेल.