25 February 2021

News Flash

यंदाच्या अर्थसंकल्पाचा वेध

‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रम गुरुवारी

‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रम गुरुवारी

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेला देशाचा २०२१-२२ सालचा अर्थसंकल्प हा अनेकांगाने अभूतपूर्व आणि महत्त्वाचा धोरण दस्तऐवज ठरणार आहे. महसुली बाजू करोना टाळेबंदीमुळे लंगडी पडलेली आणि साथीच्या संकटाच्या मुकाबल्यासाठी खर्च वारेमाप अशी परिस्थिती असताना, अर्थसंकल्पातून आगामी नियोजनाचा लेखाजोखा कसा असेल, याचा वेध येत्या गुरुवारी, २८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून घेतला जाणार आहे.

अर्थसंकल्पापूर्वी होत असलेल्या या विश्लेषणातून, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि प्रसिद्ध अर्थविश्लेषक मंगेश सोमण हे १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य तरतुदी आणि घोषणांचा पट वाचकांपुढे खुला करतील. पुनीत बालन ग्रुप आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सह-प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता-विश्लेषण’ कार्यक्रमाचे स्टोरीटेल अ‍ॅॅप हे पॉवर्ड बाय सहयोगी आहेत.

तब्बल ४५ वर्षांनंतर देशाच्या अर्थवृद्धी दर प्रथमच शून्याखाली जाईल, असे भाकीत रिझव्‍‌र्ह बँकेसह सर्वच प्रतिष्ठित अर्थसंस्थांनी व्यक्त केले आहे. तथापि, अर्थव्यवस्थेने सकारात्मक कलाटणी घेणेही फार दूर नसल्याचाही रिझव्‍‌र्ह बँकेचाच आशावाद आहे. रब्बी पिकांच्या पेरणीत झालेली वाढ पाहता, यंदा भरघोस पिकाचा दिलासा अर्थव्यवस्थेला मिळण्याचाही अंदाज आहे. तरी करोना कहराचा सर्वाधिक जाच ज्या उद्योग क्षेत्रांना बसला त्यांना सावरण्यासाठी आणि कर्मचारी कपात व वेतन कपातीचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांना कोणता कर-नजराणा अर्थमंत्री देतील, याकडे सर्वाचेच डोळे लागले आहेत.

दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात, वाचकांनाही आपल्या शंका व प्रश्न मांडण्याची संधी मिळेल. सहभागासाठी  http://tiny.cc/Ls_BudgetVishleshan_2021 येथे नोंदणी आवश्यक.

’सहप्रायोजक : पुनीत बालन ग्रुप, लोकमान्य मल्टिपर्पज

को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

’पॉवर्ड बाय : स्टोरीटेल अ‍ॅप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 1:00 am

Web Title: loksatta vishleshan event on thursday zws 70
Next Stories
1 ‘अदानी’ला विनानिविदा पारेषण प्रकल्पाचे कंत्राट?
2 शेतकरी आज राजभवनावर
3 अखिल भारतीय किसान सभेचं ‘लाल वादळ’ मुंबईत दाखल
Just Now!
X