विघ्नहर्त्यांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली असताना आता केवळ त्याच्या आगमनाचा अवकाश आहे. असं असताना अनेक ठिकाणी घरगुती गणपतींची संख्या आणि गणपतीची पूजा सांगणारे गुरुजी यांचे प्रमाण व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही अडचण लक्षात घेऊन, गणेशाची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी याचा ऑडिओ लोकसत्ताच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे आता जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात असलेल्या गणेश भक्तांना ’लोकसत्ता’च्या मदतीने गुरूजींशिवायही गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करता येईल. त्याचप्रमाणे दिवसातील दोन वेळच्या पूजेसाठी महत्त्वांच्या आरत्यांचा व्हिडिओही तयार करण्यात आला असून http://www.youtube.com/LoksattaLive या लोकसत्ताच्या यूट्यूब पेजवर तो पाहता येईल. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ख्याती असलेल्या जी.एस.बी.सेवा मंडळ, किंग्ज सर्कल येथील गणेशोत्सवाचे यंदा हिरकमहोत्सवी वर्ष असून पाच दिवसांच्या या गणपतीचे थेट प्रक्षेपण ’लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर पाहवयास मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देश-विदेशातील घरगुती तसेच सार्वजनिक गणपती वाचकांना ’लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. त्याचबरोबर ’घरचा गणपती सजावटीचे फोटो’ पाठवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी तुमच्या घरच्या गणेशाचे फोटो तुम्ही  loksatta.express@gmail.com या इमेल पत्त्यावर पाठवू शकता.  पारंपारिक आणि आधुनिक वाद्यांच्या तालावर निघणा-या मिरवणुका हा जगभरातील गणेश भक्तांच्या आकर्षणाचा विषय. मुंबई-पुणे या शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या सोहळ्याची वेगळीच शान असते. प्रत्येकाला हा सोहळा प्रत्यक्ष अथवा टिव्हीवर पाहणे शक्य नसते. म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून लोकसत्ताच्या संकेतस्थळावर गणेश विसर्जन सोहळ्याचा ’लाईव्ह ब्लॉग’ वाचण्याची सुविधा वाचकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
– ऑडिओ : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी  
–  व्हिडिओ : गणपतीच्या आरत्या
– लाईव्ह दर्शन – जी.एस.बी.सेवा मंडळ, किंग्ज सर्कल
–  लाईव्ह ब्लॉग’ :गणेश विसर्जन सोहळा  
– आवाहन : ’घरचा गणपती सजावटीचे फोटो’ पाठवा
–  फोटो गॅलरी : देश-विदेशातील घरगुती तसेच सार्वजनिक गणपती