देश-विदेशातील आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील ताज्या बातम्या, निर्भीड अग्रलेख आणि दर्जेदार लेख वाचण्यासाठी वाचकांच्या पसंतीचे एकमेव ठिकाण असणारे ’लोकसत्ता’चे indianexpress-loksatta.go-vip.net संकेतस्थळ नव्या रूपात वाचकांपुढे आले आहे. वाचनाचा निखळ आनंद देण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्राचा वापर करून नव्या सुविधा आणि वैशिष्ट्यांचा समावेश संकेतस्थळाच्या नव्या रुपात करण्यात आला आहे. ’लोकमान्य लोकशक्ती’ असलेल्या ’लोकसत्ता’च्या नव्या रुपातील संकेतस्थळाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, अनेकांनी नव्या रुपाचे कौतुक केले.
स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेऊन मोबाईल आणि डेस्कटॉप या दोन्ही प्रकारांमध्ये हे संकेतस्थळ सहजपणे उघडता यावे आणि महत्त्वाच्या बातम्या प्राध्यान्यक्रमाने वाचता याव्यात, अशी रचना करण्यात आली असून, त्यादृष्टीने ’व्हर्टकिल नॅव्हिगेशन बार’ संकेतस्थळामध्ये देण्यात आला आहे. संकेतस्थळावरील डाव्या बाजूच्या वरील कोपऱ्यातून वाचक या सुविधेचा वापर करू शकतील.
वाचकांना आवडलेले लेख आणि बातम्या समाजमाध्यमांवर शेअर करण्याची सुविधाही देण्यात आली असून, वाचक स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया संकेतस्थळावरील बातमी किंवा लेखाखाली नोंदवू शकतील. ’लोकसत्ता’च्या विविध कार्यक्रमांचे व्हिडीओ, त्याचबरोबर िहदी, मराठी चित्रपटसृष्टी, क्रीडजगत आणि इतर महत्त्वाच्या घटनांशी संबंधित छायाचित्रांची गॅलरीही वाचकांना रोजच्या रोज पाहता येईल. मोबाईलवरूनही वाचक ही गॅलरी पाहू शकतील.

नव्या रुपातील संकेतस्थळाची सुटसुटीत रचना आणि आकर्षक मांडणी वाचनाचा अनुभव अधिक समृद्ध करणारी आहे. यामध्ये वाचकांना महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, संपादकीय, लाईफस्टाईल आणि लेख अशा विविध दालनांतील बातम्या आणि लेख सहजपणे उघडून वाचता येतील.

या लेखांना
साजेशी मोठ्या आकारातील छायाचित्रेही संकेतस्थळावर पाहता येतील. छायाचित्रांमुळे मूळ विषय नेमकेपणाने समजून घेण्यास वाचकांना मदत होणार आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांतील बातम्याही वाचक थेटपणे संबंधित दालनात जाऊन वाचू शकतील.