लोकसत्तानं आयोजित केलेला तरूण तेजांकित हा अतिशय आगळावेगळा असा उपक्रम असल्याची पावती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शनिवारी मुंबईमध्ये 12 कर्तृत्ववान तरूणांचा उद्योगपती बाबा कल्याणी व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. तब्बल 450 तेजस्वी ताऱ्यांमधून तज्ज्ञांच्या निवड समितीने 12 जणांची निवड केली आहे.

तरूण तेजांकित या पुरस्काराच्या ट्रॉफीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील अत्यंत तेजस्वी अशी युवा पिढी आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे तेजस्वी तारे हे समाजापुढे आणण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये अशीही लोक आहेत ज्यांचं कार्य मोठं आहे पण ते अजून समाजापुढे आलेलं नाही. त्यामुळे हे व्यासपीठ जे लोकसत्तानं निर्माण केलंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे.”

या पुरस्कारांमुळे तरूणांना प्रेरणा मिळेल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

[jwplayer 58Dy74O0]