नावात काय आहे? शेक्सपियरच्या या विधानाला छेद देत मुंबईच्या आशिष तांबे या कलाकाराला नावात साक्षात गणराय दिसले आणि सुरू झाला ‘अक्षर गणेश’चा प्रवास. मुंबईतील चेंबूर परिसरात राहणारा हा तरूण कलाकार प्रत्येकाच्या नावामधून काही क्षणात बाप्पाचे रूप साकारतो. त्याने साकारलेला आपल्या नावातील ‘अक्षर गणेश’ पाहून चराचरामध्ये वसलेले बाप्पा आपल्या नावातदेखील वसल्याची प्रचिती आपल्याला येते. वयाच्या सहाव्या वर्षापासून या कलाक्षेत्रात असलेल्या आशिषच्या ‘अक्षर गणेश’ कलाप्रकाराला वर्षभरापूर्वी सुरूवात झाली. आजपर्यंत हजाराहून अधीक नावातून त्याने गणराय साकारले आहेत. हातात कागद आणि पेन येताच काही क्षणात तो तुमच्या नावातून गणेश साकारतो.
नावातून काहीतरी नाविन्यपूर्ण साकारण्याचा विचार आशिषच्या मनात घर करून बसला होता. आशिष, आपल्या या विचाराला कागदावर मृतिमंत रूप देण्याचा प्रयत्न करत असताना, एका क्षणी कागदावर नावातून साक्षात बाप्पा प्रकटले आणि त्या दिवसापासून आशिषचा अक्षर गणेश साकारण्याचा प्रवास अविरत सुरू आहे. अत्तापर्यंत आशिषने मराठी चित्रपट सृष्टीतील सचिन पिळगावकर, भरत जाधव, मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, शशांक केतकर, तेजश्री प्रधान, अवधूत गुप्ते, आदेश बांदेकर, केतकी माटेगावकर, प्रथमेश परब अशा अनेक प्रसिध्द कलावंताच्या नावातून अक्षर गणेश साकारून त्यांना ही कालाकृती भेट म्हणून दिली आहे.
आशिष फेसबुकवर असून, त्याने साकारलेले अनेक ‘अक्षर गणेश’ येथे पाहायला मिळतात. आपल्या या अनोख्या कलेविषयी बोलताना आशिष म्हणतो, “या कलेच्या माध्यमातून मी बाप्पाला नेहमी माझ्यासोबत ठेवतो. ‘अक्षर गणेश’ मुळे माझ्या मित्रपरिवारात वाढ झाली. आई-वडिलांचा आशीर्वाद आणि रसिकांच प्रेम यामुळे हा पल्ला गाठू शकलो” ‘अक्षर गणेश’चा त्याचा हा प्रवास असाच निरंतर चालू राहो हीच सदिच्छा! गणपती बाप्पा मोरया !!!
 

raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!