News Flash

खरेदीवर बक्षिसे जिंकण्यासाठी शेवटचे दोन दिवस

खरेदीबरोबर बक्षिसाचा दुहेरी आनंद मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’चे शेवटचे दोन दिवस उरले आहेत.

अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी दुकानांना नुकतीच भेट दिली. यावेळी तिचे स्वागत करताना ‘नम्रता ज्वेलर्स’चे शांतीलाल गाला आणि विनय गाला.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ला उदंड प्रतिसाद; प्रसिद्ध सिनेकलाकारांची सहभागी दुकानांत उपस्थिती

खरेदीबरोबर बक्षिसाचा दुहेरी आनंद मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’चे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आतापर्यंत अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री मधुरा वेलणकर, स्वाती लिमये, शर्मिष्ठा राऊत, गायिका वैशाली सामंत यांनी दादर, नायगाव, बोरिवली या परिसरातील दुकानांना भेट देऊन यात रंगत आणली आहे. २७ जानेवारीला या खरेदी महोत्सवाची सांगता होणार आहे.

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, गिफ्ट कूपन, एसी, ओव्हन अशी आकर्षक पारितोषिके जिंकता येतील. महोत्सवाच्या अखेरीस पहिल्या भाग्यवान विजेत्याला ‘केसरी टुर्स’कडून सहलीचे पॅकेज यासारखी पारितोषिके दिली जाणार आहेत. हा महोत्सव १६ जानेवारीपासून सुरू झाला असून बृहन्मुंबई परिसरातील अनेक शोरूमनी सहभाग घेतला आहे.

कसे सहभागी व्हाल?

* लोकसत्ता मुंबई शॉपिंग महोत्सवात सहभागी असलेल्या दुकानांमध्ये ५०० रुपयांपेक्षा तसेच दागिन्यांच्या दुकानांमधून ३००० रुपयांपेक्ष हून अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिलासोबत एक कूपन दिले जाईल.

* ते कूपन भरून दुकानातील ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळली जातील.

* ड्रॉपबॉक्समध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून विजेत्यांची निवड केली जाईल व त्यांची नावे ‘लोकसत्ता मुंबई’मधून प्रसिद्ध क रण्यात येतील.

* अटी-शर्ती लागू आहेत.

या महोत्सवात सहभागी होऊ  इच्छुक दुकानदारांनी अधिक माहितीसाठी संपर्क :

* नमिता खांडभोर  ८१०८३८८१२२ आणि निक्षित राठोड ९८२०५५१२५० यांच्याशी संपर्क साधावा.

प्रायोजक

‘रिजेन्सी’ समूह प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ‘वास्तू रविराज’ आणि ‘पितांबरी’ पॉवर्ड बाय पार्टनर आहेत. ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ हे या फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर आहेत. ‘एम.व्ही. पेंडुरकर ज्वेलर्स’, ‘व्ही. एम. मुसळुणकर अँड सन्स ज्वेलर्स प्रा.लि.’, ‘नम्रता ज्वेलर्स’, ‘मे. पांडुरंग हरी वैद्य अँड सन्स ज्वेलर्स’, ‘उज्ज्वल तारा’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. याशिवाय ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’ आणि ‘अजय अरविंदभाई खत्री’ हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत. फूड अँड बेवरेजेज पार्टनर ‘अंग्रेजी ढाबा’, ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स’, एंटरटेन्मेंट पार्टनर ‘एनडीज फिल्म वर्ल्ड’, हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘लँडमार्क मर्सिडीज’ आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:28 am

Web Title: lot of response to loksatta mumbai shopping festival
Next Stories
1 मुंबई पोलीस दलात आता ‘बेल्जियन शेफर्ड’
2 पालिकेच्या तीन रुग्णालयांत जनआरोग्य योजना बंद
3 माहुलच्या ‘मरणकळा’
Just Now!
X