28 February 2021

News Flash

‘लोकसत्ता ९९९’ला विक्रोळीत उदंड प्रतिसाद

मंडळातील स्थानिक जोडप्यांसोबत हार, कंबर पट्टा, पैंजण असा गंमतीशीर खेळ खेळण्यात आला.

पारितोषिक प्रदान करताना रामबंधूचे नवनाथ जाधव आणि अभिनेत्री ऋजुता देशमुख

नवभक्ती, नवरंग आणि नवरात्री अशा तिहेरी संगम असलेल्या ‘लोकसत्ता ९९९’ या अनोख्या स्पर्धेचा तिसरा सोहळा विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागातील दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात शुक्रवारी रात्री पार पडला. उखाणे आणि पारंपरिक खेळांच्या स्पर्धाबरोबर नृत्य, पाककला, प्रश्नमंजूषा यासारख्या विविध स्पर्धानी सोहळ्यात रंगत आणली. आबालवृद्धांच्या सहभागामुळे उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्यात आनंद, उत्साह आणि नवरंगांची बरसात झाली.

नवरात्रोत्सव केवळ गरब्यापुरता मर्यादित न ठेवता आपल्या मराठमोळ्या संस्कृतीशी मिलाफ घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘नवभक्ती, नवशक्ती आणि नवरंग ९९९’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. रामबंधु चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’ अंतर्गत या उपक्रमाच्या विक्रोळी येथील कार्यक्रमास अभिनेत्री ऋजुता देशमुख ही खास उपस्थित होती. प्रिया साटेलकर आणि कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रश्नमंजूषा कार्यक्रमाने सोहळ्याला सुरुवात झाली. स्ट्रॉपासून फुगे फुगवून लॉलीपॉप बनवण्याचा खेळही खेळण्यात आला. या दोन्ही खेळातील विजेत्या महिलांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

मंडळातील स्थानिक जोडप्यांसोबत हार, कंबर पट्टा, पैंजण असा गंमतीशीर खेळ खेळण्यात आला. यामध्ये जोडप्यांनी एकापेक्षा एक उखाणे घेतले. मंडळातील लहान मुलांनी नृत्य सादर केले. सामूहिक नृत्याविष्कारही यावेळी सादर करण्यात आला. बॉलीवूड, लावणी, जोगवा आदी विविध नृत्यांमध्ये प्रेक्षक दंग झाले. ‘सौभाग्यवतीं’च्या स्पर्धेत जिंकलेल्या श्रेया वडके यांना ‘एम. के घारे ज्वेलर्स’चा एक लखलखता हार ‘लोकसत्ता’चे महेंद्र धारवडकर यांच्या हस्ते देण्यात आला. ‘दिवाळी फराळ’ या पाककला स्पर्धेत महाविद्यालयीन तरुणींपासून आजीपर्यंत सर्वजणी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत आकांक्षा मस्तेकर, सुमन गावकर, निकिता हेलेकर, मीता माने आणि करिश्मा काळे या विजेत्यांना ‘राम बंधु मसाले’ यांच्यातर्फे पारितोषिके देण्यात आली. स्पर्धकांनी मक्याचा चिवडा, पालक चंपाकळी, मूगडाळ मैदा चकली, चकली नाचोज, मुखवास यासारखे पदार्थ तयार केले होते. विविध नावीन्यपूर्ण पदार्थ स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाले, असे मत अभिनेत्री आणि परीक्षक ऋजुता देशमुख हिने व्यक्त केले.

नवरात्रोत्सवाच्या या कार्यक्रमाला ‘रामबंधु’चे नवनाथ जाधव, क्रिष्णा काळे हेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस विक्रोळी येथील ‘दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’ला ‘लोकसत्ता’तर्फे ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

प्रायोजक

रामबंधु चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’चे सहप्रायोजक केसरी टूर्स, कलर्स आणि रिजन्सी ग्रुप आहेत. तर ‘पॉवर्ड बाय’ एम. के. घारे ज्वेलर्स असून, अपना सहकारी बँक लिमिटेड हे बँकिंग पार्टनर आहेत.

आज डोंबिवलीत

हा उपक्रम रविवारी (१४ ऑक्टोबर) डोंबिवली पूर्व येथील ‘एकता मित्र मंडळ’, एकता नगर, बिंगो पार्क सोसायटी जवळ, नांदिवली रोड, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.

‘लोकसत्ता ९९९’ हा कार्यक्रम विक्रोळीत आयोजित करण्यात आला होता. आमच्या मंडळातील कार्यकर्त्यांचे कौतुक झाले, तसेच विभागातील महिलांना त्यांच्यातील कला-गुण दाखवण्याची संधी मिळाली. त्याबद्दल ‘लोकसत्ता’चे खूप खूप आभार. ‘सौभाग्यवती’ हा खेळ वेगळाच होता. असेच प्रोत्साहनपर कार्यक्रम सातत्याने करत राहा.

– श्रेया वडके

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 12:41 am

Web Title: lots of response to the loksatta 999
Next Stories
1 शिवसेनेची परंपरा वाहतुकीच्या मुळावर
2 दुर्गोत्सवात धुनिची नृत्ये, सिंदुरखेला, रवींद्र संगीत
3 नवरात्रीमुळे फूलबाजारात उत्साह
Just Now!
X