News Flash

प्रियकराकडून फॅशन डिझायनरची हत्या

गेल्या आठवडय़ात चेंबूर आणि ट्रॉम्बे येथे सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या अवशेषांची ओळख पटली आहे. कांता शेट्टी

| November 6, 2013 06:27 am

गेल्या आठवडय़ात चेंबूर आणि ट्रॉम्बे येथे सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या अवशेषांची ओळख पटली आहे. कांता शेट्टी (३५) असे या महिलेचे नाव असून ती फॅशन डिझायनर आहे. तिचा प्रियकरप्रभाकर शेट्टीने तिची हत्या केली असून, चेंबूर पोलिसांनी त्याला अटक केली.
२९ ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या चरई तलावाजवळ प्लॅस्टिकच्या एका बॅगेत महिलेचे धड सापडले होते. रिक्षातून आलेल्या एका इसमाने ही बॅग फेकली होती. दुसऱ्या दिवशी ट्रॉम्बे चिताकॅम्प येथील एका झुडुपात या महिलेचे दोन पाय सापडले होते. वेगवेगळे अवयव सापडल्याने या महिलेची नेमकी ओळख पटली नव्हती. कांताच्या बहिणीने ती हरवल्याची तक्रार केली होती. तिचा प्रभाकरशी संबंध असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेतल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. कांताने प्रभाकरकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावला होता. त्याचे गावाला लग्न ठरल्यामुळे त्याने कांताची हत्या केली. तो यापूर्वी एका हॉटेलात कोंबडी कापण्याचे काम करत होता. त्यामुळे तो मृतदेहाचे अवयव वेगवेगळे कापण्याचे निघृण कृत्य करू शकल्याचे
पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 6:27 am

Web Title: lover killed fashion designer in mumbai
Next Stories
1 मंगळयान फेसबुकवर लाइव्ह
2 एसटीची ३३० कोटींची ‘सामाजिक बांधिलकी’
3 छटपूजेनिमित्त भाजपच्या मनसेलाच ‘वाकुल्या’!
Just Now!
X